श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या एस एस सी मार्च 2024 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

By : Polticalface Team ,22-02-2024

 श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या एस एस सी मार्च 2024 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

   लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या एस एस सी मार्च 2024 या बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते.


      याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयात सहा वर्षांपासून शिक्षण घेत असतानाच्या आठवणींना उजाळा देत आई-वडिलांबरोबरच शिक्षकांनी देखील शिस्त व संस्काराचे उत्तम असे धडे देत आपल्या भाषणातून विद्यालयाविषयी भावनिक असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी कुमारी माधुरी शिरसाट, लोंढे आरती, खाम्बलिंग गायकवाड, गौरव धावडे, सिद्धेश काकडे, द्रोण लगड, तृप्ती नगरे, तेजश्री साळवे इत्यादी विद्यार्थ्यांनी आम्हाला जिथे ज्ञानाचे धडे व उत्तम संस्कार मिळाले त्याबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.


        व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नागवडे कारखान्याचे माजी संचालक व स्कूल कमिटीचे सदस्य विलासराव काकडे, स्कूल कमिटीचे सदस्य पुरुषोत्तम लगड हे उपस्थित होते.


          यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ उपशिक्षिका श्रीमती नौशाद शेख यावेळी म्हणाल्या की, 21 वे शतक हे आव्हानात्मक असणार आहे. माध्यमिक शिक्षणानंतर पुढे आता शैक्षणिक वातावरण बदलणार आहे. अशा वातावरणात मानसिक, शारीरिक, कौटुंबिक स्वास्थ्य व ताण तणाव याबरोबरच विद्यार्थ्यांनी सोबत लवचिकता ठेवावी. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे मन कधीही दुखवू नये. मार्च 2024 ची बॅच ही संस्कारी होती. प्रत्येकाने जिद्द मनाशी बाळगावी निश्चितपणे यश प्राप्ती मिळेल असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.


      ज्येष्ठ कलाशिक्षक श्री अभिषेक उदमले यांनी यावेळी शालेय जीवनात ध्येय जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत यशाचे शिखर गाठू शकत नाही, तेव्हा कितीही संकटे आली तरी त्या संकटावर मात करत पुढे जो जातो तो निश्चितपणे यशस्वी होतो असे सांगितले.


      ज्येष्ठ शिक्षक अविनाश कांबळे यावेळी म्हणाले की, सगळे चोरीला जाते. परंतु ज्ञानाची चोरी कधीही होत नाही. त्यामुळे भरपूर अभ्यास करून अधिकाधिक ज्ञान मिळवावे असे सांगितले.


          अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी म्हणाले की, प्रत्येकाने आचरण शुद्ध ठेवावे, आदर्श नागरिक व्हावे, व्यसनापासून दूर राहावे, विद्यालयाचे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न आहेत. निश्चितपणे या विद्यार्थ्यांमध्ये उच्च ध्येय गाठण्याची क्षमता आहे. असे सांगून पुढील शिक्षणासाठी प्राचार्य श्री सस्ते यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


         यावेळी यावेळी उपशिक्षक संजय दळवी, श्री संभाजी इथापे, श्री तुषार नागवडे, श्री आनंदा पुराणे, श्री एस पी इथापे आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.


      यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी पूर्वा काकडे या विद्यार्थिनीने केले आभार कुमारी सानिका गायकवाड हिने मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.