वांगदरीचे ग्रामदैवत श्री अंबिका मातामूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,26-02-2024

वांगदरीचे ग्रामदैवत श्री अंबिका मातामूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न

   लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील ग्रामदैवत श्री अंबिका मातेच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलेशरोहन कार्यक्रम विविध ज्येष्ठ विधी तज्ञांच्या उपस्थितीत मंत्रोपचारने महायज्ञ सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी गुरुवर्य ह भ प शांतिनाथ महाराज पंढरपूर, ह भ प तुकाराम महाराज भारती, ह भ प पद्माकर महाराज देशमुख यांच्या हस्ते धार्मिक विधीद्वारे पार पडला.


      यावेळी गुरुवर्य शांतिनाथ महाराज पंढरपूर यांचे सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित भाविक भक्तांसमोर बोलताना शांतिनाथ महाराज पुढे म्हणाले की, वांगदरी श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते व वांगदरीगावचे आधारस्तंभ दिवंगत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांचे या ग्रामदैवत अंबिका मातेच्या जीर्णोद्धाराचे स्वप्न होते. ते सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी ते पूर्णत्वास नेले. ग्रामस्थांनी देखील नागवडे कुटुंबाच्या या संकल्पनेला भरभरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ही मोठी अभिमानाची बाब आहे. असे सांगून शांतिनाथ महाराज पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापू हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. आपला राजकीय प्रवास करत असताना बापूंनी वांगदरी गावचे नाव कुठलाही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तुत्वावर जिद्दीने महाराष्ट्राच्या नकाशावर आणले. असे हे थोर सतपुरुष निस्वार्थी व निर्मळ मनाचे बापू यांनी तालुक्याच्या प्रत्येक भागाचा विकास करताना आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. मोठे योगदान दिले. बापू हे मोठ्या मनाचे ऋषितुल्य नेते होते. ते वांगदरी गावात जन्माला आले, हे वांगदरीकरांचे भाग्य म्हणावे लागेल. शांतिनाथ महाराज आणखी पुढे म्हणाले की, एकदा फुल कोमलले तसे पुढे उमलणार नाही. बापूंनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात कुटुंबापेक्षा आपल्या समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. सत्तेपेक्षा सत्कार्याला देखील तितकेच महत्त्व दिले. असे सांगून शांतिनाथ महाराज आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी जेवढी राजकारणाची वाटचाल केली तितकेच ते आषाढी व कार्तिकी एकादशीला जायचे राजकीय व सामाजिक प्रवास करताना बापूंनी धार्मिक कार्यावर देखील मोठी मनोभावे श्रद्धा ठेवली.


       ग्रामस्थांनी देखील यापुढे आता दररोज ग्रामदैवत अंबिका मातेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक व्हावे, पावित्र्य जोपासावे. नागवडे कुटुंबीयांचे संकल्प आणि ग्रामस्थांच्या सहभागातून श्रद्धास्थान असलेल्या अंबिका मातेला चांगल्या वास्तूमध्ये बसविले. जिथे 400 ते 500 वर्षापूर्वीचे हे मंदिर उभे होते. ते सहकार महर्षी बापूंसारख्या वैभवशाली माणसाने पुण्य कर्म केले, म्हणून या मंदिराची मोठ्या उत्साहात जीर्णोद्धार होत आहे. या कामी वांगदरीकर हे सर्वच भाग्यशाली व पुण्यवान आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे देखील शांतिनाथ महाराज यांनी आवर्जून सांगितले


  शांतिनाथ महाराज आणखी पुढे म्हणाले की, मंदिर म्हणजे पाठशाळा आहे. ज्याची दगडावरती निष्ठा आहे भावना आहे तो पवित्र धन्य समजला जातो. देव मन पाहत असतो धन पाहत नसतो. असे सांगत नागवडे कुटुंब हे सुसंस्कृत निर्मळ मनाचे आहे. या कुटुंबाने धार्मिक क्षेत्रावर अपार श्रद्धा ठेवले आहे सहकार महर्षी बापूंचा वारसा देखील राजेंद्र दादा नागवडे अनुराधाताई नागवडे व दीपक शेठ नागवडे यांनी समर्थपणे चालवला असून या कामी वांगदरी गावच्या ग्रामस्थांनी देखील तितकेच मौलिक सहकारी कायम ठेवले आहे असे सांगत या कामी धार्मिक उपक्रमाचे नागवडे कुटुंबासह वांगदरीच्या सर्वच ग्रामस्थांचे  शांतिनाथ महाराज यांनी भरभरून कौतुक केले


    या प्राणप्रतिष्ठा व कलेश रोहन सोहळ्यास पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हा बँक संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, घनश्याम शेलार, नागवडे करण्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, शरद नवले, भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव नागवडे, माजी सरपंच आदेश शेठ नागवडे, दीपक शेठ नागवडे, सरपंच संजय काका नागवडे, उपसरपंच छाया मासाळ, चेअरमन विजय नागवडे, भाऊसाहेब हंडाळ, भाऊ पाटील नागवडे, शिवाजीराव पाचपुते, ज्ञानदेव हिरवे, दिनकर पंदरकर, हेमंत नलगे, नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वांगदरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी प्रास्ताविकात गावच्या ग्रामदैवत अंबिका माता मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ग्रामस्थांचा मौलिक सहभाग त्याबरोबरच मंदिर जीर्णोदराच्या कार्यात वाहून घेणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचे व उपस्थित मान्यवरांचे श्री नागवडे यांनी आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.