मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जनता विद्यालयाची निवड

By : Polticalface Team ,28-02-2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जनता विद्यालयाची निवड लिंपणगाव (प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेहमीच विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असते, सुसज्ज भव्य इमारत, विद्यालयाच्या सभोवताली असलेली पर्यावरण पूरक वृक्षांची जोपासना भव्य दिव्य क्रीडांगण त्याचबरोबर एस.एस.सी बोर्ड परीक्षा केंद्र, शासकीय चित्रकला परीक्षा, तालुका, विभाग स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजनविविध खेळांची क्रीडांगणे, प्रयोगशाळा भव्य स्वच्छतागृह त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या साठी उपलब्ध असलेले ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान व अटल टिंकरिंग लॅब व विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक फिल्टर पाणी , गुणात्मक वाढीसाठी सुरू असलेला गुरुकुल प्रकल्प अशा वेगवेगळ्या बाबीमुळे या विद्यालयात नेहमीच वेगवेगळे उपक्रम यशस्वी केले जातात . चालू वर्षी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमात विद्यालयाने सहभाग नोंदवला होता. नुकताच निकाल घोषित करण्यात आलेला आहे ,यात जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काष्टीचा तृतीय क्रमांक मिळवला आहे.या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य पंडितराव घोंगडे यांना जाते, त्यांनी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून भौतिक सुविधा त्याचबरोबर गुणात्मक विकास करण्यावर वर भर दिलेला आहे. त्याचबरोबर या उपक्रमाची जबाबदारी गुरुकुल प्रमुख तालुका क्रीडा संघटनेचे सचिव हरिश्चंद्र शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यालयात हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना श्री राजू गावित, शरद शिंदे, नवनाथ पवार आशा कदम, महजबीन पठाण, अश्विनी निकम आदी शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. सर्वच शिक्षकांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात नक्कीच भर पडली आहे. या यशाबद्दल राज्याचे मा. मंत्री तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री बबनरावजी दादा पाचपुते , स्कूल कमिटीचे सदस्य भगवानरावआबा पाचपुते, अरुणराव तात्या पाचपुते , बाळासाहेब आप्पा राहिंज व काष्टी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री .साजन भैय्या पाचपुते, काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश भाऊ पाचपुते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते आदींनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती फराटे मॅडम, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे साहेब ,निळकंठ बोरुडे साहेब विस्ताराधिकारी सिताराम भुजबळ साहेब आदींनी कौतुक केले आहे.त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,माता पालक ,शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य ,सर्व विद्यार्थी ,ग्रामस्थ सर्व सेवक आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी