विवाह सोहळ्यात नवरीचे दागिने आणि पाकिटे चोरणारी सराईत आंतरराज्य टोळी दौंड पोलिसांकडून तीन आरोपी जेरबंद

By : Polticalface Team ,29-02-2024

विवाह सोहळ्यात नवरीचे दागिने आणि पाकिटे चोरणारी सराईत आंतरराज्य टोळी दौंड पोलिसांकडून तीन आरोपी जेरबंद

दौंड (प्रतिनिधी)   विवाह सोहळ्यात गर्दीत फायदा घेऊन नवरिचे दागिने खिशातील पैशांची पाकिटे,साहित्यावर डल्ला मारणाऱ्या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात एका महिला गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यातील दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

       याबाबत सविस्तर वृत्त असे, दि २७ रोजी पवार पॅलेस काष्टी रस्त्यालगत एक विवाहसोहळा सुरु असताना निलेश पवार रा.सोनवडी ता.दौंड यांना काही संशयित हे गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत लक्षात आले. त्यांनी तात्काळ दौंड पोलिसांना माहिती कळविली. दौंड पोलिसांनी तत्काळ पवार पॅलेस मंगल कार्यालय गाठले आणि कार्यालयातील निलेश पवार आणि नागरिकांच्या मदतीने दोन इसमांना आणि एका महिलेला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राज रामनारायण सिसोदिया (वय-२७), बलभीम माकड सिसोदिया (वय-१९), शब्बोबाई प्रतापसिंग सिसोदिया (वय-५०) सर्व (रा. गुलखेड ता. राजगड मध्यप्रदेश) अशी सांगितली. पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांनी जबरदस्ती चोरी केलेले पाकीट त्यामध्ये ६ हजार ५०० रू हे राज रामनारायण सिसोदिया याच्याजवळ मिळून आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आमच्यासोबत राहुल रामनारायण सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा.रायगड मध्यप्रदेश) हे देखील असल्याचे सांगितले.आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात मंगल कार्यालयातील दागिने चोरीसाठी हे इसम येतात. या टोळीने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत अधिकची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

      ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभागाचे स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ पोलीस अमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते, सुरेश चौधरी, रवी काळे, अशोक जाधव आदींनी केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी