पुढील वाढीव अनुदान टप्पा मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षक प्राध्यापकांचा दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार!

By : Polticalface Team ,01-03-2024

पुढील वाढीव अनुदान टप्पा मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षक प्राध्यापकांचा दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार! लिंपणगाव (प्रतिनिधी)- 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षक तथा प्राध्यापकांनी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. तशा प्रकारचे निवेदन संबंधित प्राध्यापकांनी कार्यरत शाळेतील प्राचार्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात बहिष्कार प्राप्त प्राध्यापकांनी म्हटले आहे की राज्य शिक्षक समन्वय संघाच्या निर्णयानुसार वरील संदर्भानुसार दिनांक 3 जानेवारी 2024 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा या मागणीसह इतर मागण्यांकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून, अद्यापपर्यंत सदरील मागणीबाबत शासन स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय मंडळांमध्ये सुरू असलेल्या बारावी बोर्ड परीक्षा व मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य होऊन दिनांक 1 जानेवारी 2024 पासून प्रत्येक वर्षी अनुदानाचा वाढीव टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित करेपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे शिक्षक समन्वय संघाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना कार्यरत शिक्षक व शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन लगड, समन्वयक श्री निसार शेख व कायम विनाअनुदानित कृती समिती श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्षा श्रीमती पुष्पलता पाचपुते यांनी बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार बाबत निवेदन सादर केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी