प्रतीक पेट्रोल पंपाच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

By : Polticalface Team ,02-03-2024

प्रतीक पेट्रोल पंपाच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

   लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील प्रतिक पेट्रोल पंपाच्या संचालिका व यशस्वी उद्योजिका श्रीमती नयनतारा शिंदे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त खा. डॉ. सुजय विखे पा. व तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते व डॉ. प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते सन्मान करणेत आला.श्रीमती नयनतारा शिंदे यांनी अकाली आलेल्या वैधव्याने खचून न जाता जीवनामध्ये मोठा संघर्ष करुन व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन खंबीरपणे उभ्या राहिल्या व मढेबडगांव येथे प्रतिक पेट्रोल पंपाचा व्यवसाय अतिशय यशस्वीपणे चालविला आहे. श्रीमती शिदे यांनी शेती व पंपाचा व्यवसाय करत असताना गेल्या ८-१० वर्षापासुन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिलेले आहे. निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षण याकरीता फळ झाडांचे वाटप करणे, गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रोत्साहनपर बक्षिस देणे, शाळा इमारतीस आर्थिक मदत करणे याकरीता त्यांनी सातत्याने मदतीचा हात पुढे केलेला आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनाची व यशस्वी वाटचालीची नोंद घेवून डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल सहीस एक्सलंस अॅवार्ड देवून गौरविण्यात आले होते. तसेच गतवर्षी मढेवडगांव ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून त्यांना सन्मानीत करणेत आले आहे.


श्रीमती शिंदे यांच्या कार्याची नोंद अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पा. व तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी घेवून दि. १ मार्च रोजी श्रीगोंदा येथे जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान नारीशक्तीचा सांस्कृतिक महोत्सव २०२४ व कर्तृत्वान महिलांच्या सन्मान सोहळ्यात श्रीमती शिंदे यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा यथोचीत गौरव करण्यात आला. श्रीमती शिंदे यांच्या सन्मानाबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी