By : Polticalface Team ,02-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. ०२ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे वासुंदे ता दौंड जिल्हा पुणे गावाचे हद्दीत इंडियन ऑइल पंपाच्या समोर अज्ञात व्यक्तीने खाजगी कंपनी एजन्सी एजंट प्रवीण मळेकर यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्रने खून केला असल्याची धक्कादायक घटना दि ०१ मार्च २०२४ रोजी रात्री 7:45 वा जे सुमारास घडली असल्याने मौजे वासुंदे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादीचे नाव ऋषिकेश प्रवीण मळेकर. रा.551 गुरुवार पेठ आधार कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 301 युको बँकेच्या समोर कस्तुरी चौक पुणे 42 यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध
गु र नं 164 2024 भा द वि कलम 302 अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
घटनास्थळी दौंड पोलिस प्रशासनाने तात्काळ धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार फोन द्वारे संपर्क साधून तपस दरम्यान चौकशी करत प्रवीण मळेकर तुमचे कोण आहेत. त्यांना कुणीतरी चाकू मारला आहे. व ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. त्यांना विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर या दवाखान्यात ॲम्बुलन्स मधून पाठवून देत आहे. तुम्ही तेथे जाऊन थांबा असे फोनवरून सांगितले.
दिनांक 01/03/2024 रोजी सकाळी 09/15 वा.चे सुमारास हिरो होन्डा पँशन मोटार सायकल नंबर MH 12 EP 9336 या वरुन खाजगी कंपनी रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहते घरातुन बारामती परिसरात गेले होते. फिर्यादी यांनी फोनवर फोन करुन सदरचा प्रकार हा कोठे झाला या बाबत विचारले असता. दौंड तालुक्यातील मौजे वासुंदे गावचे हद्दीत इंडीयन आँईल पेट्रोल पंपाचे समोर बारामती फलटण रोडवर झाला असल्याचे सांगितले असता रात्री 09/05 वा.चे सुमारास विश्वराज हाँस्पीटल येथे फिर्यादी ऋषिकेश मळेकर पोहचले त्यां नतर रात्री 09/15 वा.चे सुमारास फिर्यादी यांचे वडील प्रविण मळेकर यांना अँम्बुलन्समधुन हाँस्पीटल मध्ये आणले. तेव्हा मुलाने वडीलांना हाक मारली असता जख्मी असलेले प्रवीण मळेकर यांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. त्यांचे पोटात कोणीतरी हत्याराने भोकसल्याने पोटातील आतड्या बाहेर दिसत होत्या. व पाठीवर कमरे जवळ वार झालेले दिसत असल्याचे म्हटले आहे.
फिर्यादी यांचे वडिलांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन व कोणत्यातरी धारदार हत्याराने भोकसुन त्यांना जिवे ठार मारुन त्यांचा खुन केला आहे. म्हणुन अज्ञात इसमाविरुद्द फिर्याद आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादी जबाब इकडेल प्राप्त झाल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. दाखल अधिकारी स.पो.नि गटकुळ - स.पो.नि राठोड पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :