दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे - दिव्यांग कर्मचारी संघटनेची मागणी

By : Polticalface Team ,05-03-2024

दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे - दिव्यांग कर्मचारी संघटनेची मागणी    लिंपणगाव( प्रतिनिधी )-आगामी विधानसभा व लोकसभेच्या कामकाजातून दिव्यांग कर्मचाऱ्यांना वगळावे अशा आशयाचे पत्र नायब तहसीलदारांना नुकतेच देण्यात आले. दिव्यांगांना निवडणुकीचे कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवास करणे, सामान घेऊन जाणे, खेडेगावात मुक्कामी राहणे अशा अनेक अडचणी येतात. म्हणून दिव्यांगांना निवडणूक कामातून सूट द्यावी असा शासन निर्णय असतानाही अनेक वेळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे आदेश येतात. परिणामी निवडणुकीचे कामकाज पार पाडणे दिव्यांगांना मोठे कठीण जाते. म्हणून दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली. तसे पत्र संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचारी संघटनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष श्री दादासाहेब गव्हाणे संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक तथा जिल्हा संघटक प्रा. ईश्वर कणसे, तालुका कार्यकारणी सदस्य श्री शशिकांत मस्के यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांनी सांगितले की , निवडणूक आयोगाने दिव्यांग कर्मचारी, महिला कर्मचारी अशा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची विशिष्ट कोड मध्ये माहिती मागवली आहे. ऑर्डर देण्याचा अधिकार जिल्हा निवडणूक आयोग आला आहे. आयोग शासन निर्णयाचे पालन करून दिव्यांगाना सहकार्य करण्याची भूमिका घेत असतो. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी