By : Polticalface Team ,06-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरणात कुकडीचे २००एमसीएफटी पाणी सोडून आठ गावांना आवर्तन सोडावे ,अशा मागणीचे निवेदन जिल्हा बँकेच्या संचालिका व राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ अनुराधाताई नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदनाद्वारे केले आहे या निवेदनात सौ नागवडे यांनी म्हटले आहे की, धरण लाभक्षेत्रातील बेलवंडी, घारगांव, लोणी व्यंकनाथ, चिंमळा, शिरसगांव बोडखा, पिंपळगांव पिसा, पिसोरे बु., हंगेवाडी या आठ गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो. या गावांमध्ये फळबागा, ऊस व इतर चारा पिके -मोठ्या प्रमाणांत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते व व फळबागा आणि चारापिकांचे पाण्याअभावी नुकसान होते.
, पुढे या निवेदनात सौ नागवडे यांनी म्हटले आहे की, सध्या कुकडी डाव्या कालव्याचे आतर्वन चालू असून सदर आवर्तनामधुन २०० एम.सी.एफ.टी. पाणी विसापुर धरणात सोडून कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. तशा प्रकारचे आदेश पाटबंधारे विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी सौ नागवडे यांनी याप्रसंगी केली आहे यावेळी राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदराव नवले यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :