महाशिवरात्रीनिमित्त लिंपणगाव मध्ये सिद्धेश्वर महाराजांचा शुक्रवारपासून यात्रा उत्सवास प्रारंभ

By : Polticalface Team ,07-03-2024

महाशिवरात्रीनिमित्त लिंपणगाव मध्ये सिद्धेश्वर महाराजांचा शुक्रवारपासून यात्रा उत्सवास प्रारंभ

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लिंपणगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीपासून सुरू होत आहे. यानिमित्त ग्रामस्थांकडून तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिवशी पहाटे दोन वाजेपासून पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सिद्धेश्वर महाराजांना महाअभिषेक घातला जातो. महाशिवरात्र असल्याने दिवंगत अरुणराव भगत यांच्या स्मरणार्थ भाविक भक्तांना मंदिर परिसरात खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या सायंकाळी 9 ते 11 ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे यांचे हरिकीर्तन आयोजित केले आहे. यात्रेचा दुसरा दिवस हा मुख्य दिवस समजला जातो. गाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिलांकडून दंडवत व सिद्धेश्वर महाराजांना शेरनी कार्यक्रम चालू होणार आहे. त्याचं रात्री 8 ते 11 ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी सोहळा मिरवणूक भजनी मंडळाकडून आयोजित करण्यात आली आहे. पालखी मिरवणूक सोहळ्यानिमित्त प्रत्येकाच्या घरासमोर आकर्षक सडा रांगोळी काढून श्री सिद्धेश्वर महाराजांचे दारोदारी महिला व अबाल वृद्धांकडून स्वागत होणार आहे. यावेळी पालखी सोहळ्यानिमित्त रात्री 11 ते 11:30 वाजता शोभेचे दारू काम हे डोळ्याचे पारणे फेडावे अशाप्रकारे आतिश बाजी सालाबाद प्रमाणे होत असते. पालखीचे मंदिरात विसर्जन झाल्यानंतर त्याचं रात्री 11:30 नंतर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्याचा तमाशा पार पाडणार आहे.


       यात्रेचा तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी पुन्हा 9 ते 12 विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा हजेरी कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच दिवशी दुपारी  3.30 ते 6 वाजेपर्यंत मल्लांसाठी जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. या आखाड्यामध्ये दूरवरून मल्ल सहभागी होतात. त्यांना यात्रा कमिटी कडून मोठी बिदागी दिली जाते.  त्याचं रात्री पुन्हा 8 ते 11:30 वाजता आनंद महाजन यांचा लोकनाट्याचा तमाशा कार्यक्रम होणार आहे.


      दरम्यान लिंपणगावचे हे ग्रामदैवत भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारे हे ग्रामदैवत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या नवस व आशा आकांक्षा या दैवताकडून पूर्ण होतात तसा अनुभवही अनेक भाविक भक्तांना येत असल्याने महाशिवरात्री दिवशी तालुका व जिल्ह्यातून अनेक भक्तगण सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपली वर्षपूर्तीची संकल्पना सिद्धेश्वराचरणी व्यक्त करतात. त्यामुळे प्रत्येकाचे श्रद्धास्थान म्हणून या ग्रामदैवताकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक भाविकांची नवस्फूर्ती देखील पूर्ण होते. तसा अनुभव देखील प्रत्येकाला निश्चितपणे मिळतो. यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून सरपंच तर उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच पाहत असताना यात्रा कमिटीची पंच कमिटी ही सदस्य म्हणून तीन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेत असतात. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञ सुधीर कुलकर्णी व मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव व सौरभ गुरव हे ग्रामस्थांना सालाबादप्रमाणे सहकार्य करतात या धार्मिक उत्सवाचा तालुका व जिल्ह्यातील भाविक भक्तांनी सुवर्ण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावच्या यात्रा कमिटी कडून करण्यात येत आहे. यात्रा सुरक्षित व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून, यात्रेमध्ये दबंगगिरी व गैर कृत्य करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. तरी कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्वांनी शांततेत व शिस्तीचे पालन करून दर्शन घ्यावे ,असे आवाहन देखील यात्रा कमिटीकडून करण्यात येत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी