By : Polticalface Team ,08-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान सालाबाद प्रमाणे दरवर्षी लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. ते तीन दिवस चालते यावेळी यात्रा कमिटी कडून विविध धार्मिक व मनोरंजन पर कार्यक्रम आयोजित केले असून, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या ग्रामदैवताला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पहाटे पाच वाजेपासूनच आबालवृद्धांनी महाअभिषेक घालून सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी अनेक भावी भक्तांनी वर्षभरात सर्वांना सुखात आनंदात व ऐश्वर्या ठेव अशा प्रार्थना करत नवस्फूर्ती फेडण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी दिसून आली. जागृत देवस्थान म्हणून तालुका व जिल्ह्यामध्ये लिंपणगावचे सिद्धेश्वर महाराज परिचित आहेत. अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना नवस्फूर्तीदरम्यान पूर्ण झाल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात.
दरम्यान भाविकांच्या म्हणण्यानुसार सिद्धेश्वर महाराज हे जागृत देवस्थान असल्याने ज्या ज्या वेळी आम्हाला कौटुंबिक अडचणी आल्या, त्या त्यावेळी आम्ही सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा समोर ठेवून ओम नमः शिवाय हर हर महादेव हे स्तोत्र म्हणतात आम्हाला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे सामर्थ्य मिळते. संकट दूर होते. आमच्या वर्षभराच्या स्वप्नपूर्ती देखील या जागृत देवस्थानाच्या श्रद्धेमुळे पूर्ण होतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक महाशिवरात्रीला सिद्धेश्वर महाराजांना महाभिषेक घालून नतमस्तक होत आहोत. निश्चितच सिद्धेश्वर महाराज हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रतिक्रिया उपस्थित दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान महाशिवरात्र असल्याने लिंपणगाव पंचक्रोशीतील भावी भक्तांनी हर हर महादेव म्हणत पहाटेपासूनच सिद्धेश्वर मंदिरात महाभिषेक व दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यात्रा कमिटीने देखील यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरा सभोवताली आकर्षक अशी रोषणाई करून डोळ्याचे पारणे फेडावे अशाप्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. पहाटेपासूनच महाभिषेक यासारखे धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी भाविक भक्तांना ज्येष्ठविधीतज्ञ सुधीर कुलकर्णी मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव व सौरभ गुरव सहकार्य करताना दिसले. निश्चितच श्रीगोंदा तालुक्यातील या ग्रामदैवताची यात्रा उत्साही व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीने योग्य ते नियोजन केल्याचे यात्रा कमिटी कडून सांगण्यात येत आहे. लोकनाट्य सारखे मनोरंजन पर कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामस्थ व भाविक भक्तांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने देखील निमंत्रण देण्यात आल्याचे यात्रा कमिटी कडून समजते
वाचक क्रमांक :