लोणी व्यंकनाथ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,10-03-2024

लोणी व्यंकनाथ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा लिंपणगाव (प्रतिनिधी) लोणी व्यंकनाथ येथे सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या वतीने जागतिक महिला दिन वंदना काकडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन छाया भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी मनीषा नहाटा सरपंच लोणी व्यंकनाथ ,मीरा शिंदे, उर्मिला जठार, वंदना मगर, स्मिता सोनवणे, प्रतिभा उंडे, प्रियंका रायमोकर, संगीता घोडेकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्तृत्ववान अकरा महिलांचा ट्रॉफी, गुलाब पुष्प, देऊन सन्मान करण्यात आला आणि या प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अशा कार्यक्रमातून महिलांना हिम्मत मिळते , महिलांचे नेतृत्व वाढवण्यासाठी आणि स्टेज डेरिंग वाढवण्यासाठी संविधान प्रचारक छाया भोसले प्रयत्न करत आहेत.आणि संविधान गट महिलांच्या सुखदुःखात हिर हिरेने सहभागी होतात एकमेकांना समजून घेऊन महिला सशक्त करण्याचं काम करत आहेत. महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचार करावा महिलांनीच महिलांचा शत्रू होऊ नये एकमेकांना समजून घेऊन एकजुटीने एकत्र राहून विकासाच्या दिशा सर्व महिलांनी ठरवाव्यात असे ही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अशा व्यक्त केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया भोसले, मनीषा काकडे, संध्या काकडे, कल्पना जठार ,सुषमा खलाटे, निलोफर शेख ,पूजा डांगे, सविता हिरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मनीषा नहाटा सरपंच लोणी व्यंकनाथ, हनुमंत मगर उपसरपंच लोणी व्यंकनाथ, अजित काकडे सदस्य लोणी व्यंकनाथ यांनी विशेष सहकार्य केले. विशेष म्हणजे हा महिलांचा कार्यक्रम महिलांनीच स्वतः पुढाकार घेऊन याचे आयोजन नियोजन केले होते.अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी