By : Polticalface Team ,11-03-2024
दौंड (प्रतिनिधी)घराशेजारी लावलेल्या कबुतरांच्या पिंजऱ्यातुन १५० रेसर कबुतरे आणि एक बिटल जातीची शेळी चोरी करणाऱ्या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींनाही अखेर दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील चार आरोपींना दोन महिन्यांपूर्वीच अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, गेली दोन महिन्यापुर्वी फिर्यादी
सुजित ज्ञानदेव शिंदे (रा.चोरमलेवस्ती ता.दौंड) हे घरात झोपले असताना त्यांच्या राहत्या घराशेजारच्या कबुतराच्या पिंजऱ्यातुन सुमारे १५० रेसर कबुतरे कुणीतरी अज्ञात चोरून नेत असल्याची माहिती एका शेजाऱ्याने फोन करून फिर्यादीला दिली.त्यावेळी बाहेर येऊन पाहिले असता फिर्यादीला पाहून दोघे अज्ञात चोरटे पळून गेले.फिर्यादीने जवळ जाऊन पाहिले असता कबुतराची जाळी तोडून त्यातील कबुतरे चोरून नेल्याचे दिसले. शेजारी बांधलेली शेळीही गायब असल्याने लक्षात आल्यावर अज्ञातांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यातील चार आरोपींना दि.२५ जानेवारी रोजीच अटक केली होती. त्यानंतर दौंड पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींचा १) गौरव रोहिदास माकर, वय २५ वर्षे, रा. साळोबा वस्ती खुटबाव ता.दौड जि.पुणे
२) गोरख मच्छिद्र जाधव वय ३५ वर्षे रा. खुटबाव ता दौड जि.पुणे शोध घेऊन त्यांना अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील चोरी गेलेल्या कबुतरांपैकी ४२ कबुतर जप्त करून ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड हा गौरव रोहिदास माकर (रा.साळोबावस्ती खुटबाव ता. दौंड) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पो.हवालदार महेश भोसले, पो.हवालदार सुभाष राऊत, पो.हवालदार नितीन बोराडे, पो.नाईक आदेश राऊत, पो.कॉन्टेबल रवी काळे आदींनी केली आहे.
वाचक क्रमांक :