टीडीएफ ची नूतन कार्यकारणी जाहीर नाशिक विभागीय अध्यक्षपदी संजय पवार तर निमंत्रित सदस्य पदी भाऊसाहेब कचरे यांची निवड, अनेक महत्त्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा
By : Polticalface Team ,12-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- शिक्षकांची सर्वात मोठी संघटना म्हणून लौकिक असलेल्या शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ या संघटनेच्या पुढील चार वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये संजय पवार धुळे यांची नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाली. अरविंद कडलग संगमनेर यांची कार्यवाहपदी, नाशिकचे मोहन चकोर यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नगर जिल्ह्यातून भाऊसाहेब कचरे यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. टी डी एफ चे राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 10 मार्च रोजी नाशिक मध्ये कार्यकारिणीची बैठक पार पडली. शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढील सहा महिन्यात पार पडणार आहे. त्या दृष्टीने नाशिक विभाग टीडीएफ ची सर्वसमावेशक कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये जेष्ठांना पदसिद्ध निमंत्रित सदस्य आणि मार्गदर्शकाची भूमिका देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नानासाहेब बोरस्ते, हिरालाल पकडल यांचे हस्ते नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. नाशिक विभाग कार्यकारणी उपाध्यक्ष सुनीता गरुड जळगाव, मनोज शिरसाठ नाशिक, ललित जगताप नगर, सहकार्यवाह प्रभाकर नांद्रे नंदुरबार, डी एस पाटील धुळे, महिला प्रतिनिधी सुषमा थोरात सरोज देवरे नाशिक, कार्यकारणी सदस्य रविंद्र मोरे, गुफरान अन्सारी, शिवाजी शिरसाट, अरुण पवार, मंगेश सूर्यवंशी, चंद्रशेखर सावंत, समीर जाधव, भाऊसाहेब शिरसाठ, पल्लवी जाधव, पी जे देवरे नाशिक, डीजे मराठे, आर आर साळुंखे, व्ही टी गवळे धुळे, मधुकर पवार, सुधीर काळे, भीमराज खोसे, दत्तराज सोनवणे, शरद सोनवणे नगर, निमंत्रित सदस्य भाऊसाहेब कचरे नगर, एस के पाटील, एस पी महाजन, अरुण सपकाळे, राजेंद्र शिंदे जळगाव, एन टी पाटील अंबालाल पाटील दत्तात्रय शिंदे शहादा नंदुरबार आदी पदाधिकाऱ्यांचा या कार्यकारणी मध्ये समावेश आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.