By : Polticalface Team ,13-03-2024
                           
              लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतने राबविलेल्या घरकुल प्रकल्पास राज्यातील नाशिक विभागांमध्ये अमृत महाअवास अभियान अंतर्गत द्वितीय पुरस्कारासाठी निवड होऊन 12 मार्च रोजी नाशिक येथे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधा नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाची 39 गुंठे जागा ग्रामपंचायतकडे एक खास बाब म्हणून वर्ग करून घेतली. व सदर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा आदर्श पतदर्शी घरकुल प्रकल्प उभा करण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले. सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतने बारकाईने लक्ष देऊन 35 घरकुलांचे सर्व सुविधांनी युक्त असे अतिशय दर्जेदार काम करून घेतले आहे. येथील रियल फॉर फाउंडेशन यांनी 22 लाखाचा निधी दिलेला आहे.
सदर प्रकल्पास आकार देण्याकरिता राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधा नागवडे यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसागर साहेब, विद्यमान कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे साहेब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे पठाडे साहेब व साळवे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत गुंजाळ साहेब, तत्कालीन गटविकास अधिकारी राम जगताप, विद्यमान गटविकास अधिकारी राणीताई फराटे, विस्तार अधिकारी मोसीन मालजपते, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अनिल जगताप व नवनाथ गोरे, माजी सरपंच दगडू सोनलकर रामदास भडांगे, महेश शेठ नागवडे, आदेश शेठ नागवडे यांनी विशेष परिश्रम घेऊन कामात चालना दिली. सदर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात सरपंच संजय काका नागवडे यांच्यासह उपसरपंच छाया मासाळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रकल्प पूर्ण केला.
सदर प्रकल्पाचे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे झाले असून, त्याकरिता सर्व मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देऊन प्रकल्प दर्जेदार होण्याकरिता प्रयत्न केले. त्यास यश आले असून, सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याच्या नाशिक विभागामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12 मार्च रोजी नाशिक येथे झालेल्या भव्य समारंभात सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे व अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे हस्ते आणि उपायुक्त कोळसे मॅडम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे साळवे साहेब श्रीगोंदा गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांच्या प्रमुख उपस्थित वांगदरी गावचे सरपंच संजय काका नागवडे, महेश शेठ नागवडे, अभिषेक नागवडे, शिवाजी चोरमले, तुषार नागवडे, विष्णू आबा मोहिते, अशोक पारखे, हनुमंत काटे, धनंजय चोरमले, विकास आडागळे, गणेश दिवेकर, दिलीप मासाळ, अशोक फराटे, हेमंत काका नागवडे, बाबासाहेब दाते, रामचंद्र गवळी, देविदास नागवडे, भाऊसाहेब गवळी, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वांगदरी ग्रामपंचायतीने राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनबद्ध व परिश्रमपूर्वक हा दर्जेदार पथदर्शी प्रकल्प उभा केला व त्यास विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. ही बाब वांगदरी गावच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानाची असून गावच्या नावलौकिकात भर घालणारे आहे समस्त वांगदरी गावचे ग्रामस्थ व घरकुल योजनेचे लाभधारक यांच्याकडून नागवडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष