क्षूद्राची वागणूक मान्य आहे पण बटाई नको. - संतोष भोसले

By : Polticalface Team ,13-03-2024

क्षूद्राची वागणूक मान्य आहे पण बटाई नको.                              - संतोष भोसले लिंपणगाव( प्रतिनिधी) -मला क्षूद्राची वागणूक मिळत आहे पण तरीही समाज परिवर्तनाची जिद्द सोडणार नाही. गेल्या दोन वर्षापासून बटाई झालेल्या घरात राहत आहे त्यामुळे मला जवळच्या नातेवाईकासह इतर पारधी समाजाकडून क्षूद्राची वागणूक मिळत आहे. पाणी पिण्यासाठी आमच्या बटाई झालेल्या भांड्यात घ्यायचे असेल तर वरून दिले जाते, जेवण करून दिले जाते भांड्याला भांड खेटू दिले जात नाही. गेल्या दोन वर्षापासून माझ्या घरात अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा आले नाहीत. पण तरीही आदिवासी पारधी समाजातील बटाई ही अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी मी मागे हटलो नाही. 2017 पासून मी सामाजिक कार्यात आल्यापासून आदिवासी पारधी समाजाच्या विविध वस्त्यांवर गावात भेटी दिल्या त्यादरम्यान मला समजले की आदिवासी पारधी समाजामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात बटाईही अंधश्रद्धा पाळली जाते. आणि यात महिलांना खूप खालच्या स्तरावरचे स्थान दिले जाते ज्या आईने स्वतःच्या मुलाला जन्म दिला आहे तोच मुलगा जर आईचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेणे ही बटाई समजली जात असेल तर किती वाईट गोष्ट आहे अशा एक ना अनेक घटना माझ्या डोळ्यासमोर होत्या आदिवासी पारधी समाजातील अनेक लोकांनी अनेक लोकांना बटाईची धमकी देऊन लोकांना घाबरवून खूप लोकांना त्रास दिला वेदना दिल्या लोकांना आला त्यांच्या स्वतःच्या घरापासून प्रॉपर्टी पासून बटाई करून दूर केले लेकरा बाळांची हाल अपेष्टा केली. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर मला दिसत होती आणि म्हणून मी ही बटाई प्रथा समूळ नष्ट करण्याचा निश्चय केला आणि 2018 पासून या बटाईचा विरोध करत आदिवासी पारधी समाजामध्ये बटाईला धरून जे घडत नाही ते घडवायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने विविध लग्नांमध्ये विविध देव देवात ज्या महिलांची आणि आपली ओळख नाही पण कार्यकर्त्याच्या माध्यमातून एखाद्या अनोळखी कुटुंबाच्या घरी गेलो तर तेथे मी निसंकोचपने बटाई ही अंधश्रद्धा बाजूला ठेवून जेवायला सुरुवात केली आणि बटाईला विरोध करू लागलो. परंतु 2021 मध्ये माझेच घर बाटवण्यात आले तेव्हापासून खरी बटाई किती त्रासदायक आहे किती भयानक आहे ते मला आणखीनच जाणवले कारण त्या दिवसापासून मला क्षुद्राची वागणूक मिळू लागली पण त्याला मी किंचितही न घाबरता न डगमगता सामोरे गेलो आणि जात आहे. मी स्पष्टपणे सांगितले ज्याला माझ्या बटाई झालेल्या घरात यायचे असेल त्यांनी या नाहीतर कुणी नाही आले तरी चालेल पण मी या बाटलेल्या घरातून मुळीच बाहेर पडू शकणार नाही. कारण मला समाज परिवर्तन हवंय बटाई नको अशा भाषेत मला ज्ञान पाजणाऱ्या आणि बटाई पाळ म्हणणाऱ्या लोकांना मी उघड उघड सांगत आलो आहे आणि सांगत राहील. कारण मला आदिवासी पारधी समाजाला बटाई या अंधश्रद्धेची लागलेली कीड समुळ नष्ट करायची आहे. कितीही त्रास झाला तरी चालेल पण बटाई समूळ नष्ट करणार आणि त्याची सुरुवात मी स्वतः पासून स्वतःच्या घरापासून केली आहे आज जरी मी एकटा असलो पण उद्या आणि भविष्यात अनेक सुशिक्षित तरुण या आदिवासी पारधी समाजातील बटाई या अंधश्रद्धेचा निषेध करतील विरोध करतील असा मला विश्वास आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष