छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील छत्रपती अकॅडमीचे दैदिप्यमान यश!!

By : Polticalface Team ,14-03-2024

छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील छत्रपती अकॅडमीचे दैदिप्यमान यश!! लिंपणगाव (प्रतिनिधी) -श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या ,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जून २०२२ मध्ये छत्रपती अकॅडमी ची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयात सुसज्ज ४०० मी. चा ट्रॅक उपलब्ध असून पहाटे ५ वाजलेपासून विद्यार्थी सराव करतात.लेखी परीक्षा व ग्राउंड ची तयारी करणेसाठी महाविद्यालयाने पूर्ण वेळ प्रशिक्षक नेमलेले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या पोलीस भरती व भारतीय सैन्य दलामध्ये ५२ विद्यार्थ्यांची निवड झाली. या कामाची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचा सन्मान झाला. करिअर कट्टा अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा भरतीची तयारी करून घेतली जाते. २०२४ मध्ये झालेल्या वनरक्षक भरती मध्ये सर्वोत्कृष्ट निकाल देत नऊ विद्यार्थ्यांची वनरक्षक पदी निवड झाली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रामकृष्ण काळे, राजेंद्र निंभोरे, तुषार लगड, अक्षय लाटे, शरद चाकणे, श्रद्धा दांगडे, अंकित धनवडे,साक्षी इंगळे,अजय गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच भारतीय सैन्यदलात चार विद्यार्थ्यांची निवड झाली यामध्ये खराडे विराज, कानगुडे ऋषिकेश, जाधव अशितोष, खामकर स्वप्निल यांचा समावेश आहे. तसेच अंकित धनवटे या विद्यार्थ्याची मंत्रालय लिपिक म्हणून निवड झाली. सन २०२३-२४ मध्ये सरकारी व औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण १२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, सर्व विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा असा मानस आहे की, २०२४ मध्ये सुरू झालेल्या पोलीस भरतीमध्ये किमान १०० विद्यार्थी भरती व्हावेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा १०० विद्यार्थी भरती व्हावेत. बापूंनी बिकट परिस्थितीत या संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी जीवाचे रान केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही सर्वजण करत असून या महाविद्यालयातून विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर त्याच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही झोकून देऊन काम करत आहोत. महाविद्यालय ही फक्त पदवी देणारे संस्था न राहता विद्यार्थ्याला रोजगार देणारी संस्था बनावी असे स्वर्गीय बापूंचे स्वप्न होते ते सत्यात उतरवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे सर्व विश्वस्थ मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व टीम झोकून देऊन काम करत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संस्थेचे सर्व विश्वस्त, सौ.अनुराधाताई नागवडे,महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे चेअरमन मा. बाळासाहेब नाहाटा, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन महासंघाचे नवनिर्वाचित संचालक श्री दत्तात्रेय पानसरे,ज्येष्ठ नेते कैलास (तात्या) पाचपुते,संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, सेक्रेटरी बापूराव नागवडे, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी.के. लगड,तुळजाभवानी सेवाप्रतिष्ठान संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर यांनी सर्व कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी