आनंदवाडी (नलावडे वस्ती) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
By : Polticalface Team ,15-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- आनंदवाडी (नलावडे वस्ती) येथे दर वर्षीप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन यावर्षीही मोठ्या उत्साहाने करण्यात आले आहे .मागील २७ वर्षापासून या ज्ञानयज्ञाचे आयोजन केले जाते. यासाठी परिसरातील भाविक , वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्यासाठी ही आजच्या काळाची गरज बनली आहे .आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी मनाला संस्कार व शांतता देण्याचे काम हे कीर्तनातून होत असते, आणि त्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह नेहमीच भारतीय संस्कृती व संतांचे कार्य व वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करत असतो यावर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २०मार्च २०२४ पासून तुकाराम बीज २७ मार्च २०२४ पर्यंत या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालणार आहे यावेळी विविध कीर्तनकारांच्या सुस्राव्य कीर्तनाचे आयोजिन करण्यात आले असून यामध्ये ह.भ.प शंकर महाराज गंनगे, ह.भ.प नवनाथ महाराज खोमणे,ह.भ.प देवराम महाराज गायकवाड,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज दौंडकर,ह.भ.प श्याम सुंदर महाराज ढवळे ,ह.भ.प नारायण महाराज काळे आधी कीर्तनकारांची कीर्तने सेवा होणार आहे . त्याचबरोबर दररोज प्रवचन सेवा, हरिपाठ दिंडी सोहळा असे विविध कार्यक्रम यावेळी राबवले जानार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित वारकऱ्यांच्या नाश्त्याची सोय ,भोजनाची सोय करण्यात आली आहे . सांगता दिनांक २७मार्च २०२४ रोजी ह.भ.प.श्री . महादेव महाराज काजळे, इगतपुरी यांचे काल्याचे किर्तनाने होणार असून यासाठी श्री.रावसाहेब तुकाराम खामकर यांनी महाप्रसादासाठी सौजन्य दिले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम आयोजनासाठी मा.उपसरपंच श्री. शिवाजी नलवडे मेजर, श्री. विठ्ठल नलावडे,ह.भ.प शहाजीमहाराज गिरमकर, श्री . सोमनाथ नलावडे,श्री संतोष दादासाहेब नलावडे ,श्री नानासाहेब भोईटे, श्री.विनायक नलावडे ,ग्रा. स. रामभाऊ गिरमकर, श्री आप्पासाहेब नलावडे , श्री जिजाराम नलावडे श्री.नवनाथ नलावडे.किसन नलावडे. आदींनी विशेष कष्ट घेतले आहेत. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आव्हान अखंड हरिनाम सप्ताह आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी