By : Polticalface Team ,16-03-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी दि 16 मार्च : जिल्हा परिषद शाळा पेडगाव जुने जानेवारी - 2024 महिन्यामध्ये मुख्याध्यापक श्री.लंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली होती या निवडणुकीमध्ये संविधान दीपक मस्के इयत्ता पाचवी हा विद्यार्थी मुख्यमंत्री पदासाठी निवडून आला होता, निवडणुकीनंतर विजयाच्या कार्यक्रमात संविधान मस्के यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना डिक्शनरी वाटप करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज 16/03/2024 रोजी पालक संमेलन कार्यक्रमात संविधान दीपक मस्के या विद्यार्थ्यांने लोकनियुक्त सरपंच इरफान भाई पिरजादे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रकाश आबा घोडके, इरफान काजी छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक खामकर सर यांच्या हस्ते शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत 133 विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप केले , या कामी संविधान चे वर्गशिक्षक दिगंबर भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ,कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने शाळेचे मुख्याध्यापक श्री लंके सर, शिक्षक रासकर सर, सोनवणे मॅडम, परहर मॅडम, पालक,संतोष खराडे, रफिक शेख बाळू चव्हाण, स्वाती दीपक मस्के, राणी सागर घोडके, वर्षा प्रकाश घोडके , साधना संदीप शिंदे, आदी उपस्थित होते , सर्व उपस्थित त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना डिक्शनरी वाटप करून एक अनोखा संदेश शालेय मुख्यमंत्री संविधान यांने दिला असून संविधानला पुढील शिक्षणासाठी पेडगावचे लोक निर्वाचित सरपंच इरफान भाई पिरजादे यांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :