By : Polticalface Team ,17-03-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील के. पी. जाधव विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये एच एस सी बोर्ड परीक्षा 2024 ही सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पडली. या केंद्रामध्ये एच. एस. सी. परीक्षेसाठी एकूण 227 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सदर परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च 2024 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या बोर्ड परीक्षेच्या कालावधीत शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोकराव कडूस, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी अनिलराव शिंदे, आदींनी परीक्षा दरम्यान कालावधीत विशेष पथकाद्वारे भेटी देऊन आढावा घेतला.
या परीक्षेसाठी केंद्र संचालक प्राचार्य मोहिते जे एस. उपकेंद्रसंचालक प्रा एस पी देवकर, सहाय्यक परिरक्षक प्रा सचिन लगड आदींनी परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता एच एस सी 2024 ची परीक्षा सुरळीत पार पडली. याप्रसंगी दक्षता कमिटीने देखील मौलिक असे सहकार्य केले.
वाचक क्रमांक :