चिमण्या वाचवा, निसर्ग वाचवा : प्राचार्य दिलीप भुजबळमहादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली चिमण्या वाचवण्याची शपथ.श्रीगोंद्यात जागतिक चिमणी दिन साजरा !
By : Polticalface Team ,20-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) --श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथील स्काऊट यांनी चिमण्यासाठी पाणी व अन्नाची सोय करून जागतिक चिमणी दिन साजरा केला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्ताराधिकारी सिताराम भुजबळ, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊ गदादे, क्रीडा विभाग प्रमुख सचिन झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाचे अधिकारी सुधीर साबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,वाढतं शहरीकरण, परिणामी वाढलेलं काँक्रिटीकरण, कमी होत जाणारा जंगलाचा भूभाग, वाढलेलं मोबाईल टॉवरचं जाळं यामुळे चिमण्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातूनच चिमण्या वाचवण्यासाठी काही पक्षीप्रेमी पुढे आले. नोव्हेंबर २००९ पासून चिमणी वाचवण्याची मोहीम सुरू झाली.एकेकाळी सर्रास पाहायला मिळणाऱ्या चिमण्या शहरातून मात्र मोठ्या प्रमाणावर गायब झाल्या आहेत. अन्नसाखळीत एक महत्वाचा दुवा असणारी चिमणी आज झपाट्याने घटत चालली आहे याच्यावर मंथन करण्याचा दिवस म्हणजे जागतिक चिमणी दिवस.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ही घरी गेल्यानंतर त्यासाठी युवा इतर पक्षांसाठी आपल्या घराच्या खडकी येथे सर किंवा गॅलरीत अन्नपाण्याची सोय करण्याची ठरविले.
कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील स्काऊट पथक व महादजी शिंदे विद्यालय स्काऊट पथकातील स्काऊट व स्काऊट मास्टर विकास लोखंडे यांनी शाळेच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिमण्यांसाठी व इतर पक्षांसाठी अन्न पाण्याची सोय केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खेडकर व आभार शिवाजी थिटे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी