श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडावे शेतकऱ्यांची मागणी, तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पाणी पातळीत मोठी घट

By : Polticalface Team ,22-03-2024

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडावे शेतकऱ्यांची मागणी, तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पाणी पातळीत मोठी घट

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- उन्हाची तीव्रता अत्यंत वेगात सुरू होत असतानाच पाणी पातळीत देखील तितकीच घट होताना दिसते. त्यामुळे चालू वर्षी पाणीटंचाईला सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीला श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड लाभक्षेत्रात आवर्तन सुरू आहे व कुकडी लाभक्षेत्राचे आवर्तन सध्या कर्जत करमाळा कडे पूर्ण दाबाने सुरू आहे. परंतु श्रीगोंदा तालुक्यात मात्र अद्यापही पूर्ण दाबाने कुकडीचे आवर्तन सुरू नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे चालू वर्षी अत्यल्प पाऊस असल्याने जमिनीतील पाणीसाठा पूर्णतः संपुष्टात आला आहे.  सद्यस्थितीला तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात शेतकरी व ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला तीव्र मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. सर्वत्र गावतळी व बंधारे पाण्याअभावी कोरडे पडली आहेत जनावरांना देखील पाणी उरले नाही त्यामुळे जनावरे देखील पाण्यासाठी हंबर्डा फोडताना दिसत आहेत. त्यामुळे पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात निर्माण झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी जीवन जगताना दिसतो आहे. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात 132 मायनर खालील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान कुकडी खालील लाभक्षेत्रात फळबागा, उन्हाळी पिके, ऊस, जनावरांचा चारा पाण्याअभावी अंतिम घटकात आहे. उन्हाळी हंगामात कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात पूर्ण दाबाने सुटले तरच पाणीटंचाई काही अंशी दूर होऊ शकते. अन्यथा उन्हाळी हंगामातील पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी पिके, खोडवा ऊस कांदा भुईमूग इत्यादी पिके भोईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. 


     सद्यस्थितीला कुकडीचे आवर्तन कर्जत करमाळ्याकडे जवळपास 25 ते 30 दिवसापासून सुरू आहे जलसंपदा विभागाने टेल टू हेड हे धोरण निश्चित केल्यामुळे श्रीगोंदेकरांना पूर्ण दाबाने पाणी केव्हा? मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीला शेतकरी कोणत्याच शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी तणावाखाली जीवन जगताना दिसतो आहे. त्यामध्ये मागील वर्षी पाऊस अत्यंत अत्यल्प असल्याने विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याने देखील तळ घाटला आहे. तितकेच शेतकरी पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी मागणी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे तशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कारण उन्हाळी हंगामात कुकडीचे हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळी हंगामाचे दोन महिने अत्यंत थरारक असणार आहेत. सद्यस्थितीला कुकडी लाभक्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांची भटकंती सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळी हंगामाचे हे आवर्तन पूर्ण दाबाने सोडले तरच काही अंशी पाणीटंचाई शिथिल होऊ शकते. तशा देखील भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.


       मिळालेल्या माहितीनुसार कुकडी लाभक्षेत्रात जलसंपदा विभागाने प्रत्येक मायनरवर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पाणी वापर संस्थांना पाणी वाटप सुरू केलेले आहे. त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांना मागणीनुसार पाणी मिळते की? नाही? याबाबत कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण पाणी वापर संस्था व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे हितसंबंध पाहता आवर्तन कालावधीत वाढीव क्षेत्र दाखवून संबंधित कॉन्ट्रॅक्टर पाणी वापर संस्थांच्या नावावर आवर्तन कालावधीत पाणीपट्टी देखील वाढीव दाखविली जाते. त्याचा आर्थिक बोजा नाहक शेतकऱ्यांवर वाढीव दाखवला जातो. असाच प्रकार मागील आवर्तन कालावधीत घडल्याने पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांमध्ये या प्रश्न मोठा वादंग निर्माण झाला होता. आजही तो प्रश्न एका पाणी वापर संस्थेचा अद्याप अनुत्तरीय आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात याबाबत संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळी हंगामातील आवर्तनावर नियंत्रण ठेवून शेवटच्या शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळाले पाहिजे याची देखील खबरदारी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. कालवा सल्लागार समितीने देखील याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अन्यथा या आवर्तना संदर्भात संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल, हे देखील तितकेच सत्य आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.