By : Polticalface Team ,22-03-2024
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार युनियन ची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून नवीन पदाधिकारी निवडी होईस्तर कुंभेज ग्रामपंचायत कर्मचारी उमेश अशोक पवळ यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद ,नगर परिषद कामगार युनियन रजिस्टर नंबर 50 79 शाखा करमाळा तालुका अध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे असे जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ जाधव यांनी जाहीर प्रसिद्ध पत्रकार द्वारे जाहीर केले आहे .
जाधव पुढे म्हणाले की करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे कर्मचाऱ्यांचे बँक खाते कन्वर्ट करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठपुरावा करणे ,कर्मचाऱ्यांचा विमा काढणे ,राहणीमान भत्ता ,प्रायव्हेट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ग्रामपंचायत वरून जमा करणे आधी प्रश्न बाबत आम्ही लवकरच करमाळा तालुका गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ जाधव यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक भविष्य निर्वाण निधी व राहणीमान भत्ता ,रजा याबाबत जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात लवकरच नवीन कार्यकारणी तयार करून एक चांगली प्रामाणिक संघटना करमाळा तालुक्यात कामकाज करणार आहे व दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वाखालीच तालुक्यातील कर्मचाऱ्याला एक संघ ठेवून एकत्रित लढा देऊन काम करणार आहे असे नूतन तालुका अध्यक्ष उमेश पवळ यांनी सांगितले आहे
वाचक क्रमांक :