डिझेल चोरी करणारे टोळीतील आरोपी ५ तासाच्या आत अटक; करमाळा पोलीस ठाणे यांची कामगिरी...

By : Polticalface Team ,22-03-2024

डिझेल चोरी करणारे टोळीतील आरोपी ५ तासाच्या आत अटक; करमाळा पोलीस ठाणे यांची कामगिरी...

करमाळा, प्रतिनिधी - रोड लगत विश्रांती करीता थांबलेल्या वाहनांची टाकी फोडून डिझेल चोरणाऱ्या टोळी पैकी एकाला करमाळा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. डिझेल चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासात या घटनेतील टोळीचा छडा लावल्यामुळे करमाळा पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे ‌

याबाबत करमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १९/०३/२०२४ रोजी तालुक्यातील जातेगाव येथे रात्रीचे वेळी अहमदनगर ते करमाळा रोडलगत थांबलेल्या कंटेनरमधील डिझेलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर अज्ञात इसमा विरूद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्हयाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेसाठी पोलीस पथक तात्काळ रवाना झाले. गोपणीय बातमीदार तसेच तांत्रीक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता सदर गुन्हयातील डिझेलची चोरी करणारी टोळी करमाळा परीसरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या  गोपणीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता सदरचे आरोपी हे पोलीसांना पाहुन त्यांचेकडील वाहनातुन पळुन जात होते. करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून पकडले.

पाठलागाअंती या टोळीतील एक आरोपी अनिल सुभाष पवार (रा. मांडवा, ता. वाशी, जि.धाराशीव) यास अवघ्या ५ तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक करून याबाबत अधिक तपास केला असता त्यांची डिझेल चोरी करणारी टोळी असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडे तपास करून त्यांच्या टोळीतील इतर आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली असुन त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यासोबतच गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ क्र.एम.एच.२३ ए.डी.४३५८ तसेच चोरी केलेले ४५ लिटर डिझेल, डिझेल भरण्याचे प्लास्टिक कॅन, प्लास्टिकचा बांगडी पाईप तसेच डिझेलची टाकी फोडण्यासाठी बनवलेले हत्यार व स्कु ड्रायव्हर असा एकुण रू.५ लाख ५४ हजार ९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील तसेच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर, पो.हे.कॉ. अझहर शेख, पो.हे.कॉ. बालाजी घोरपडे, पो.हे.कॉ. राजेश रोडगे, पो.ना. चंद्रकांत ढवळे, पो.शि. सोमनाथ जगताप, पो.शि. जालिंदर गोरे पो. शि.मेजर आनंद पवार यांनी केली आहे.

व्यावसायिक वाहन चालकांनी रात्रीचे वेळी आराम करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवावे व आपल्या वाहनाची व वाहनातील किंमती मालाची काळजी घ्यावी. कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ करमाळा पोलीस ठाणेस संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी  केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष