By : Polticalface Team ,22-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा, येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या युथ नेचर क्लबने २२ मार्च २०२४ रोजी “जागतिक जल दिन” साजरा केला. युथ नेचर क्लबच्या वतीने २८ फेब्रुवारी ते २२ मार्च २०२४ या कालावधीत "द्रव्यांश २०२४" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत पाणी बचत किंवा जलसंधारणाशी संबंधित विविध उपक्रम कॉलेज मध्ये राबविण्यात आले. यावेळी जागतिक जलदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.जी.सुर्यवंशी होते. पोस्टर तयार करणे, कचरा ॲप. हवामानाशी निगडित ऑनलाइन मोफत अभ्यासक्रम, रील्स, विविध व्हिडिओ, पी.पी.टी. सादरीकरण, युथ नेचर क्लब पाट्या, पोस्टर प्रदर्शन, रॅली, लोकांशी संवाद, पथनाट्य, जल लेखापरीक्षण सर्वेक्षण, इत्यादी विविध उपक्रम गेल्या २० दिवसांत पार पडले आणि त्याचे फोटो, व्हिडिओ या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाचा परिचय, वॉटर ऑडिट आणि नळ गळती सर्वेक्षण अहवालाची माहिती डॉ. अहिरे वाय.आर. (ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर) यांनी सादर केली. किरण हराळ यांनी युथ नेचर क्लबने आजपर्यंत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. भोस एम.एस. आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि हा पाणी बचतीचा उपक्रम आयुष्यभर सुरू ठेवावा असे संगितल. या कार्यक्रमादरम्यान दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली होती, डालिंबे रुतुजा यांनी पाणी वाचविण्यासाठी गावातील शोश खड्डे व त्याचे महत्व याविषयी माहिती दिली आणि सुहानी निंबाळकर यांनी दैनंदिन जीवनात पाण्याची बचत कशी करावी आणि नेचर क्लबमधील सदस्यांची भूमिका याविषयी माहिती दिली. श्री वैभव वनशिव, पूजा होले आणि तनया वाळुंज यांना उत्कृष्ट तीन पोस्टर सादर करणाऱ्या सदस्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष सदस्य श्री विशाल गायकवाड, व महिला सदस्य मिस मडके वैष्णवी यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट कर्णधार, सर्वोत्कृष्ट संयोजक, उपाध्यक्ष व अध्यक्ष यांनाही पारितोषिके देण्यात आली. प्राचार्य डॉ.एस.जी.सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युथ नेचर क्लबने विविध उपक्रम राबविले व ते अतिशय प्रभावी ठरले तसेच विद्यार्थ्यांनी पाण्याची बचत करून आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणावेत, असे सांगून नेचर क्लबचा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवावा असे सांगितले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात सुरू केलेल्या विविध अभ्यासक्रमांचीही माहिती दिली, हे अभ्यासक्रम मोफत आहेत. त्यांनी सर्व सभासदांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान अफरोज आणि वैभव वनशिव यांनी केले तसेच घोडेकर स्नेहलने आभार मानले. या कार्यक्रमासाठी रणसिंग मॅडम, भोस मॅडम, लांडगे मॅडम, वाघमारे मॅडम, दांडेकर सर, विष्णव चोर, सुदर्शन कोकाटे, वागस्कर रुषी, अमृता कांबळे, वैभवी बोरकर, सुहानी भोयटी, मुस्कान शेख, पवार पायल, बागल पायल, एकशिंगे शंभूराजे, साळुंके सिद्धी, विशिका कदम, प्रियांका कदम, प्राजक्ता गिरमकर, सुजाता हिरवे, विनोद मुंडेकर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :