शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना1 जानेवारी 2006 पासून आश्वासित प्रगती योजनेच्या आदेशाची आदेशाची दुरुस्ती करावी- राज्य शिक्षकेतर महासंघाचे प्रधान सचिवांना निवेदन

By : Polticalface Team ,23-03-2024

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना1 जानेवारी 2006 पासून आश्वासित प्रगती योजनेच्या आदेशाची आदेशाची दुरुस्ती करावी- राज्य शिक्षकेतर महासंघाचे प्रधान सचिवांना निवेदन लिंपणगाव (प्रतिनिधी)-- राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील सर्व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2006 पासून 12- 24 वर्षाची सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पारित केलेला शासन आदेशाची दुरुस्ती करावी अशी मागणी राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे व महासचिव पाराजी मोरे यांनी प्रधान सचिवांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेल्या निवेदनात श्री सुरासे व मोरे यांनी म्हटले आहे की, दिनांक एक एप्रिल 2010 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना या नावाने एक ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील शासनाच्या एका तिजोरीतून वेतन मिळते. त्यानुसार 12 व 24 व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती या योजनेचा लाभ राज्यातील सर्व खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालाच नाही, यासाठी शिक्षकेतर महासंघाच्या वतीने लढा देत, राज्यातील मुंबई खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ मध्ये याचिका दाखल केल्या, व त्यांचा निर्णयही कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला. परंतु न्याय मिळाला नाही. पुढे महासंघाच्या निवेदनात आणखी म्हटले आहे की, आमच्या शिक्षकेतर महासंघाने शालेय शिक्षण मंत्री महोदयांना वारंवार निवेदने देऊन विनंती केली. त्यावेळी त्यांनी मान्य केले असून कॅबिनेटमध्ये घेण्याच्या आदेशित केले व आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल महासंघाने शासनाचे आभार देखील मानले होते. परंतु सदरील शासन आदेश हा अत्यंत अन्यायकारक असल्याने राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. राज्यातील शासकीय कर्मचारी व राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या एकाच तिजोरीतून वेतन मिळत असताना हा अन्याय व भेदभाव का? असा सवाल देखील राज्य शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करण्यात आला आहे. पुढे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना रोहिणीताई किरवे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी लिहिलेल्या पत्रात सबब राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 24 वर्षाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करायची असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ही योजना लागू केल्यास सन 2023 24 या वर्षात येणारा वित्तीय भार सदरची योजना दिनांक 1 जानेवारी 2006 पासून लागू करण्यात आल्यामुळे जानेवारी 2006 ते मार्च 2023 पर्यंतची आता करायची थकबाकी इत्यादी बाबतची माहिती शासनास तात्काळ सादर केल्यानंतरच कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आली आहे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, सदरील बाबीकडे अत्यंत महत्त्वपूर्ण लक्ष घालून एक जानेवारी 2006 पासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12, 24 वर्षाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी शासन आदेशात दुरुस्ती करण्यात येऊन सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनात महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे व महासचिव पाराजी मोरे यांनी या निवेदनात केली आहे. तुषार महाजन उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना देखील या संदर्भात महासंघाने निवेदनाद्वारे कळविले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी