दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे दौंड विधानसभा व बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महिला मतदान जनजागृती अभियान संपन्न
By : Polticalface Team ,24-03-2024
दौंड(प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी महिला मतदान जागृती संदर्भात बाजारपेठ, दुकाने, बँका, भाजी विक्रेते व रस्त्यावरील महिला पुरुष यांना मतदान करण्यासंदर्भात जागृती, तसेच प्रभात फेरी काढण्यात आली, यावेळी मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली, या जनजागृती रॅलीमध्ये गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच ही जनजागृती फेरी यशस्वी करण्यासाठी श्रीमती उमा पवार प्रवेशिका तसेच महिला उपस्थित होत्या, या महिला जनजागृतीला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
वाचक क्रमांक :