By : Polticalface Team ,24-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचा नोंदीच्या सर्व ऊसाचे गाळप पुर्ण झाल्याने कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून चालू सन २०२३-२४ या ४९ व्या गळीत हंगामाची सांगता रविवार ता. २४ रोजी दुपारी ४ वाजता अत्यंत साध्या पध्दतीचे करणेत आली.
यावेळी माहिती देताना कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सतिष जांभळे यांनी सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस तोड मजूरांच्या मोठ्या अडचणीवर मात करुन हा हंगाम यशस्वीरित्या संपन्न होत आहे. सन २०२३-२४ गळीत हंगामाकरीता कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांचा नोंदलेला सुमारे ७८०३ हेक्टर तसेच गेटकेनमधील १५३० हेक्टर अशी ९३३३ हेक्टर क्षेत्राची नोंद होती. तथापि. त्यातील काही ऊसाची अन्यत्र विल्हेवाट लागली गेल्यामुळे कारखान्यास ५,८५,३६८ मे.टन ऊस उपलब्ध झाला असून त्यापासुन ६,३४,४२५ क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. यावर्षीचा सरासरी साखर उतारा १०.९२ टक्के इतका मिळालेला आहे.
सहवीज निर्मीती प्रकल्पामधून ४,६९,८४,९०० युनिट वीज निर्मीती झाली असुन त्यापैकी २,७९,८२,७८२ युनिट वीज निर्यात करणेत आलेली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधुन २०,५५,४२१ ब.लि. रेक्टीफाईड स्पिरीट उत्पादन झालेले आहे. त्याकरीता ७,६३१.०७८ मे.टन मळीचा वापर करणेत आला असुन सरासरी उतारा २६९.३२ ब.लि./मे.टन असा मिळालेला आहे. कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाचे दि. १५.२.२०२४ अखेर प्र.मे.टन रु. २७००/- प्रमाणे पेंमेंट अदा केलेले आहे. उर्वरीत पेमेंट लवकरच अदा करणेत येणार आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कामगार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष