By : Polticalface Team ,24-03-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पाटील गटाकडून कार्यकर्त्यांच्या समवेत बैठकांचे सत्र सुरु असून आतापर्यंत साठ गावांनी माजी आमदार नारायण (आबा) पाटील घेतील त्या निर्णयास आपला पाठींबा असल्याचे सांगून योग्य पक्षाकडून उमेदवारी दिली गेली तर लोकसभा निवडणूक लढवावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असे मत मांडले असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. माढा लोकसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पाटील गटाने गेले तीन दिवस बैठकांचे सत्र राबवले. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की आतापर्यंत जवळपास साठ गावांतील पाटील गटाच्या आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जेऊर ता. करमाळा येथील आयोजित बैठकीस उपस्थित राहुन आपली मते मांडली. तसेच त्यांच्या गावातील मतदारांचा कौल, सर्वसामान्य नागरिकांना बदल हवा की नको, नारायण आबा पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी की नको, विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आताच योग्य त्या पक्षात प्रवेश करुन विधानसभेसाठी उमेदवारीचा शब्द घ्यावा अशी मते संमिश्र भावना व्यक्त करत मांडली. तर अनेकांनी मागील विधानसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाची उमेदवारी घेतली असती तर आपला पराभव झाला नसल्याचे सांगत आता तो अनुभव लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय नारायण आबा पाटील यांनी घ्यावा असे सांगितले. या बैठकांना सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, प्राचार्य जयप्रकाश बिले, जि प सदस्य बिभीषण आवटे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, सरपंच पृथ्वीराज पाटील, बाजार समिती संचालक रणसिंग बापु, महेंद्र पाटील आदि पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहुन कार्यकर्त्यांच्या भावना व मते जाणून घेतली. तर पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत प्रसारक मंडळाचे सचीव प्रा अर्जुनराव सरक यांनी आतापर्यंतच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारित पाटील गटाशी निगडीत आतापर्यंत झालेल्या घडामोडींबाबत माहिती दिली. तर या बैठकांचे आयोजन एन पी मिशन 24 या सोशल मिडीया ग्रुप कडुन करण्यात आले. अजून दोन बैठकीतुन उर्वरित गावांचा कौल जाणून घेतला जाणार असल्याने आठवडाभरात पाटील गटाकडून मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिले. या बैठकानंतर करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष