कारखान्याचे बॉयलर थंडावल्याने ऊसतोड कामगार पुन्हा आपल्या मायदेशी रवाना

By : Polticalface Team ,26-03-2024

कारखान्याचे बॉयलर थंडावल्याने ऊसतोड कामगार पुन्हा आपल्या मायदेशी रवाना लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील काही कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे .चार - पाच दिवसात उरले सुरले कामगार परतीच्या मार्गावर निघतील .सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी घर ,गाव ,शेती , गुरे- ढोरे सोडून ऊस तोडणी साठी आलेल्या कामगारांना आता गावी जाण्याचे वेध लागले आहेत . श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी येथील या हंगामातील शेवटची खेप ट्रॅक्टर मध्ये भरल्यावर ऊसतोड कामगारांनी गाण्याच्या ठेक्यावरून नृत्य करत गुलालाची उधळण केली .सहा महिने काबाडकष्ट केल्यावर मोठे आनंदाने गळीत हंगामाची सांगता या ऊस तोड कामगारांनी केली. गावी जाऊन घर बांधणी, विहीर खोदणे ,मुलींचं लग्न, शिक्षण यासाठी पैसे खर्च करणार असल्याचे सांगत अर्धी रक्कम तर कर्ज फेडण्यात जाईल असेही सांगताना ऊसतोड कामगार भावनिक झाले होते . वर्षानुवर्षे आम्ही या भागात ऊसतोडीसाठी येतो. आता अनेक बागायतदारांच्या ओळखी सुद्धा झाल्या आहेत . आम्ही गावी गेलो तरी फोनवरती आमची चौकशी करतात असे म्हणत ऊसतोड कामगारांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान यावर्षीचा गळीत हंगाम शांततेत पार पडला .कोणतीही मोठी घटना घडली अगर विघ्न आले नाही. त्यामुळे आम्ही खुश आहोत .आज शेवटची ट्रीप भरली आहे .उद्या गावी निघतोय म्हणून गुलालाची उधळण करणारा ऊसतोड कामगार नृत्यात सामील झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात आल्यानंतर या भागातील उरलेली कामे उरकून ऊसतोड मजूर आता आपापल्या गावाकडे जाणार आहेत त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर चालक मालक, ऊसतोड कामगार व मुकदम यांचा सन्मान करण्यात आला. अशा अगदी आनंदी वातावरणामध्ये ऊसतोड कामगार कारखान्याचे बॉयलर थांबवल्याने पुन्हा आपल्या मायदेशी रवाना झाले आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष