फातिमा पठाण हिने रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा रोजा केला पूर्ण
By : Polticalface Team ,27-03-2024
करमाळा प्रतिनिधी
रमजान महिन्यातील पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा फातिमा पठाण हिने पूर्ण केला आहे
सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सोहळा रमजानचा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास अर्थात रोजा करतात या महिन्यांमध्ये रोजा करणाऱ्या बांधवांना विशेष असे महत्त्व दिले जाते मुस्लिम समाजात इस्लाम धर्मियांमध्ये पाच तत्त्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे अशाच पद्धतीचा कडक रोजा करमाळा येथील सहा वर्षीय फातिमा एजाज पठाण हिने केला फातिमा पठाण हिने त्याचा एक दिवसाचा रोजा अहमदनगर येथील आलमगीर मदरसा येथे सोडला करमाळा येथील स्थानिक रहिवासी तसेच सध्या अहमदनगर येथे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये कार्यरत असलेले एजाज पठाण यांची ही मुलगी असून लहान वयात कडक असा रोजा केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक :