खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर, भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोध

By : Polticalface Team ,27-03-2024

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर, भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे  रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोध करमाळा प्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी (ता. २७ मार्च) पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो आणि रामराजेंच्या नाराजीवर काय मार्ग काढला जातो हे पहावे लागणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. भाजपने खासदार निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटील रामराजे निंबाळकर नाराज झाले आहेत. भाजपने येथील उमेदवार बदलावा, अशी मागणी आहे. येथील उमेदवार बदलला नाही तर कमी मते पडल्यास आम्ही जबाबदार नाही, असे स्पष्टपणे रामराजे यांनी सांगत नाराजी बोलून दाखवली होती. माढ्याबरोबरच ते नाशिक आणि सातारा जिल्ह्यांतील आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमेवत सवांद साधणार आहेत. २८ तारखेला अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत आमदारांवर तालुक्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी