इंग्लिश स्कूल विद्यालयात लोकसभा मतदार जनजागृती सप्ताह संपन्न.
By : Polticalface Team ,27-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तहसील कार्यालय पंचायत समिती रयत संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात जनजागृती अभियान संपन्न करण्यात आले. या सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 20मार्च रोजी मतदार जागृती शपथ व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले 21 मार्च रोजी चित्रकला स्पर्धा 22 मार्चला घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
30 मार्च रोजी पाचवी ते नववी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे मतदार जागृती घोषणा देत पूर्ण गावभर प्रभात फेरी काढण्यात आली 26 मार्च रोजी इयत्ता सातवी तुकडी क च्या विद्यार्थिनी निवडणुकावर आधारित एक पथनाट्य सादर केले 27 मार्च रोजी पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या
सर्वात शेवटी मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक सुलाखे विलास भाऊ सर्व सेवक बंधू भगिनींचे व विद्यार्थ्यांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले..
वाचक क्रमांक :