बाराशे लोकसंख्येचे गाव तीन महिन्यापासून पाण्यापासून वंचित, वयोवृद्ध मंडळींना पाण्यासाठी करावी लागते भटकंती
By : Polticalface Team ,28-03-2024
करमाळा प्रतिनिधी
बाराशे लोकसंख्या असलेल्या दाही खिंडी गावात प्रचंड भीषण पाणीटंचाई झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरील करमाळा शहरात यावे लागत आहे प्रशासन अद्याप दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वयोवृद्धासह करमाळा तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा भाई धायेखिंडी शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब भगवान तोरणे यांनी दिला आहे
या निवेदनावर
सुंदरदास लांडगे
दिलीप बाळनाथ सूळ यांच्या स्वाक्षरी आहेत
दाई खिंडी हे गाव ग्रुप गम ग्रामपंचायत पांडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येत असून या ठिकाणी ग्रामसेवक कधीही येत नाही
गेली तीन महिन्यापासून पाण्याचा तुटवडा असताना ग्रामसेवकांनी याची माहिती कोणतीही गटविकास अधिकारी किंवा तहसीलदार यांना दिली नाही
तालुक्यात इतर ठिकाणी पाण्याची टँकर चालू झाली पण दाहीखिंडी येथे पाण्याचा टँकर चालू झाला नाही
गावातील अनेक तरुण मंडळी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत गावात जवळपास सर्व वृद्ध मंडळी राहतात अत्यंत कमी लोकसंख्येचे गाव असल्यामुळे राजकीय नेते मंडळीकडे या गावाकडे दुर्लक्ष करतात
या गावात 90% धनगर समाजाची लोक राहतात आता या प्रश्नात गट विकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी लक्ष घालून
या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे
वाचक क्रमांक :