नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तालुका वैभवशाली बनवू -सौ अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,29-03-2024

नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तालुका वैभवशाली बनवू -सौ अनुराधाताई नागवडे

   लिंपणगाव (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नागवडे कुटुंबावर मोठा विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सोपवली निश्चितपणे आम्ही पक्ष वाढीसाठी योगदान देऊ यापुढे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादां यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका वैभवशाली बनवू, असे गौरव द गार जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षा  सौ अनुराधाताई नागवडे यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.


     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र दादा नागवडे तर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनुराधाताई नागवडे, दक्षिण नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नहाटा, तर राज्य पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पानसरे आदींची निवड झाल्याबद्दल ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात राजेंद्र दादा मित्र मंडळ व नागवडे कारखाना कामगारांच्या वतीने सर्व सत्कारमूर्तींचा नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला. अध्यक्षस्थानी कांता आप्पा लबडे हे होते.


   या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष आनंदराव वायकर, श्रीगोंदा तालुका बारा असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव वाळुंज, प्रकाश इंगळे, दत्तात्रय भोईटे, भारत सरकार नोटरीचे जयंत शिंदे, राष्ट्रवादीचे शरद नवले, सतीश मखरे, खामकरताई, नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, छत्रपती व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, बी के लगड, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे निरीक्षक सुरेश गोलांडे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते कामगार वर्ग शिक्षण संस्थांचे प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ नागवडे पुढे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सहकार महर्षी बापूंचे कार्य आणि तालुक्याला दिलेले भरीव योगदान पाहता बापूंसारख्या मातब्बर नेत्याला सतत अन्याय सहन करावा लागला सहकार महर्षी बापूंच्या नंतरही त्यांचे पुत्र राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे या नागवडे कुटुंबाने बापूंचा सक्षमपणे वारसा चालवला. यापुढे नागवडे कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही, अशी देखील ग्वाही अजितदादांनी दिली. एवढेच नव्हे तर अजित दादांनी नागवडे कुटुंबावर मोठा विश्वास देखील टाकला. निश्चितपणे यापुढे अजित दादांना नागवडे समर्थक ठामपणे उभे राहून ज्यांनी ज्यांनी सहकार महर्षी बापूंना त्रास दिला, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे सांगून सौ नागवडे आणखी पुढे म्हणाले की, अजित दादांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्याचे पाणी प्रश्न, रस्ते, वीज असे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. यापुढे बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी, तरुणांच्या भविष्यासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तालुक्याची महिला आमदार व्हायचे आहे. असे सौ नागवडे यांनी यावेळी सांगितले.


       यावेळी राजेंद्र दादा नागवडे सत्कारला उत्तर देताना म्हणाले की, सद्यस्थितीला देश व राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आपण देखील राजकारणामध्ये योग्य दिशा घेण्याचे ठरवले. देशात काँग्रेस पक्ष असताना महा विकास आघाडी कडून मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला 50% जागा मिळतात. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची अवस्था बिकट दिसून येते. देशात पंतप्रधान मोदीं शिवाय पर्याय दिसून येत नाही, अशी स्थिती संपूर्ण देशात निर्माण झालेली आहे अजितदादांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्याला आर्थिक मदत झालेली आहे एनसीबीच्या माध्यमातून नागवडे कारखान्याला कर्ज देखील मिळाले आहे. आगामी विधानसभेसाठी देखील अजितदादांनी नागवडे कुटुंबातील अनुराधाताई नागवडे यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलेले आहे. दादा शब्दाचे पक्के आहेत, दादांचा शब्द अंतिम असतो. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, दादांच्या जवळकीमुळे तालुक्यातील विसापूर धरणात कुकडीचे पाणी सोडून सात ते आठ गावांना उन्हाळी हंगामात आवर्तनाचा प्रश्न मार्गी लागला. मागील वर्षी आम्ही आंदोलने केल्यानंतर घोड व कुकडीचे आवर्तन प्रतिकूल परिस्थितीत जलसंपदा विभागाला सोडावी लागले. आपण घेऊन सहकार महर्षी बापूंच्या विचारातून तालुका पुढे नेणार आहोत. त्यासाठी अजित दादांना आपण सर्वांनी बळ द्यावे, नहाटा व पानसरेंबाबत कार्यकर्त्यांनी गैरसमज दूर करावेत. निश्चितपणे ते अंतकरणापासून मदत करत आहेत. असे सांगून श्री नागवडे यांनी सत्कारबद्दल आभार व्यक्त मानले. 


     याप्रसंगी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष आनंदराव वायकर यांनी सहकार महर्षी बापूंनी तालुक्याच्या वैभवात भर घालताना सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात दिलेले भरीव योगदान त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती आणि नागवडे कुटुंब हे ऋणानुबंधाचे नाते आजही कायम आहे. सहकार महर्षी बापूंचा वारसा चालवताना राजेंद्र दादा नागवडे अनुराधाताई नागवडे दीपक शेठ नागवडे हे रात्रंदिवस प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे प्रश्न जाणून घेतात. असे सांगून वायकर आणखी पुढे म्हणाले की, साखर कारखाना देखील उत्तम प्रकारे चालवून ऊस उत्पादकांची वेळेत देणे, साखर कामगारांचे पगार हे वेळेत होत आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वांनीच राजेंद्र दादा व अनुराधाताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन श्री वायकर यांनी यावेळी केली.


      यावेळी सत्काराला उत्तर देताना राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा यावेळी म्हणाले की, नामदार अजित दादा पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत दादांनी सहकार महर्षी बापूंचे जवळून कामकाज पाहिले असे असताना बापू सारख्या नेत्यावर सतत अन्याय झाला त्यामुळे नागवडे कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन अजित दादांनी पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली. एवढ्यावरच न थांबता अजितदादांनी विधानसभेला देखील सौ अनुराधाताई नागवडे यांना उमेदवारी देण्याचे धोरण ठेवले. आम्ही देखील नागवडे कुटुंबाच्या तनमन-धनाने पाठीशी उभे राहून अनुराधाताई नागवडे यांना आमदार करून बापूंचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. कार्यकर्त्यांनी देखील वेळोवेळी साथ देऊन कामाला लागावे असा सल्ला नहाटा यांनी यावेळी दिला.


          यावेळी सत्कारमूर्ती दत्तात्रय पानसरे यावेळी बोलताना म्हणाले की, अजित दादांनी श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची योग्य मोट बांधली. नागवडे कुटुंबावर देखील मोठी जबाबदारी दिली. त्याबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण महामंडळाचे अध्यक्ष केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित दादा निश्चितपणे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात सौ अनुराधाताई नागवडे यांना आमदार करून मंत्री म्हणून पाठवणार आहोत. सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे नागवडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन श्री पानसरे यांनी यावेळी केले.


      सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले. आभार कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.