By : Polticalface Team ,29-03-2024
जेऊर प्रतिनिधी
इस्लामपूर ते आवाटी ही एसटी बस पूर्ववतप्रमाणे चालू करावी अशी मागणी येथील आवाटी येथील सरपंच साबीर खान पठाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान पठाण यांनी संयुक्तरित्या एका निवेदनाद्वारे इस्लामपूर आगार व्यवस्थापकाकडे केली आहे
इस्लामपूर आगार व्यवस्थापकाकडे श्री खान यांनी सदरची बस चालू करावी अशी मागणी केली आहे निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की आवाटी येथील हजरत वली चांद पाशा हा दर्गा राज्यभरात प्रसिद्ध असून या दर्ग्याच्या दर्शनासाठी इस्लामपूर परिसरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात या दर्ग्यावर वर्षभरात मोठे असे तीन धार्मिक कार्यक्रम होत असतात या धार्मिक कार्यक्रमात सामील होण्यासाठी इस्लामपूर, सांगोला, पंढरपूर, मिरज, जत, कुर्डूवाडी, सांगली अशा परिसरातील अनेक भक्तगण या दर्ग्यावर हजेरी लावतात शिवाय याच बसने सदरचे प्रवासी कार्यक्रम आटोपून परत इस्लामपूरला जात असतात इस्लामपूर परिसरात हजरत वली चांद पाशा यांचे अनेक शिष्य गण आहे सदरचे शिष्य गण बाबाच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने दर्ग्यावर उपस्थिती लावतात त्यामुळे इस्लामपूर आवाटी ही बस त्वरित चालू करावी व भक्तगणांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी श्री खान यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे
वाचक क्रमांक :