उजनी परिसरातील शेतीपंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास, शेतकरी आक्रमक, शासनाचा केला निषेध सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील

By : Polticalface Team ,31-03-2024

उजनी परिसरातील शेतीपंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास, शेतकरी आक्रमक, शासनाचा केला निषेध सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 - करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केल्याने जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला असून त्यानी आज वांगी नं 1 येथे बैठकीत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार घोषणा बाजी करत निषेध केला व तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकार मधील पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. दि. 26 मार्च रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यानी एका आदेशानुसार उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केला. त्यामुळेच उजनी जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला आहे. एक तर उजनी धरण यंदा केवळ 60.66 % इतकेच भरले . त्यामुळे अगदी सुरुवातीपासून उजनी धरण संघर्ष समिती पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मागणी करत होती. कालवा सल्लागार समितीने ढिसाळ नियोजन करत बेमालूम पणे पाणी सोडत राहिली. पाणी नियोजनाचा बोजवारा उडाला. उजनी जलाशय वेगाने रिता होत गेला. याच वेळेस संघर्ष समितीने उजनीच्या वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली . त्यासाठी भिगवण येथे भव्य रास्ता रोको ही केला. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यानी ही मागणी धुडकावून लावली. अशातच सोलापूर ला पिण्यासाठी नदीतून दोन वेळा पाणी सोडले. कालव्यातून गरज नसताना एकामागून दोन आवर्तन सोडली. यामुळेच आज जलाशय मायनस 37% टक्के इतका रिकामा झालाय. याला सर्वस्वी कालवा सल्लागार समिती,शासन व प्रशासन हे जबाबदार आहेत. " चूका यांनी केल्या शिक्षा मात्र उजनी धरणग्रस्ताना " असा काहीसा प्रकार वीज कपातीमुळे झाल्याचे दिसून येत असून धरणग्रस्तांमधे प्रचंड संताप पहायला मिळत आहे. आपली घरे,जमीनी, गाव पाण्याखाली देऊन आपल्या हक्काचं 12 टी एम सी पाणी ही उचलून न देणार्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. वीज कपाती मुळे करमाळा तालुक्यातील जलाशय काठावरील दीड लाख हेक्टर शेती धोक्यात आली आहे. उभी पिके जळण्याची भिती व्यक्त करण्यात येत असून 65 गावातील शेतकरी,ग्रामस्थ आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार मधील पक्षांच्याविरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा सूर आज वांगी मधील बैठकीत दिसून आला. तरीही सरकार कडे गार्‍हाणं मांडायचं म्हणून उध्या जिल्हाधिकारी याना भेटून वीज पूर्ववत आठ तास चालू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी याना भेटून ही न निर्णय झाल्यास पालकमंत्री, जलसंपदामंत्री यांनाही भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढे करुन ही सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील बैठकीत मतदानावर बहिष्कार किंवा सरकार मधील घटक पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय होऊ शकतो. हे सरकार मधील पक्षांना न परवडणारी बाब ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन सरकार ने तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करावा अशी एकमूखी मागणी करण्यात आली. या बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर ,उपाध्यक्ष भारत साळुंके,आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे,आदिनाथ चे माजी संचालक पांडुरंग जाधव, मकाई चे संचालक युवराज रोकडे,केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव अर्जुन तकीक, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके,वांगी तीन चे सरपंच मयूर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ रोकडे ,वांगी चार भिवरवाडीचे सरपंच रामचंद्र सूळ, उपसरपंच भाऊसाहेब शेळके, नितीन तकीक, अमर आरकिले,अतुल आरकिले,राजकुमार देशमुख, तानाजी देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण केकान,धनंजय गायकवाड, दादा भोसले,पांडुरंग खरात,सचिन देशमुख, भाजपा अभियंता सेल चे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, विष्णुपंत वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे,आबा सरडे,चंद्रकांत देशमुख, लक्ष्मण मंगवडे,सुग्रीव नलवडे,गणेश पाटील,कांता खरात,प्रदीप वाघमोडे,मंगेश जगताप, भैरवनाथ जगताप इ.शेकडो नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष