करमाळा तालुक्याच्या पाणीटंचाई संदर्भात आ. संजयमामा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...बॅकवॉटर चा वीज पुरवठा 8 तास ठेवण्याबरोबरच जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची केली मागणी ...

By : Polticalface Team ,31-03-2024

करमाळा तालुक्याच्या पाणीटंचाई संदर्भात आ. संजयमामा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...बॅकवॉटर चा वीज पुरवठा 8 तास ठेवण्याबरोबरच जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची केली मागणी ...

करमाळा प्रतिनिधी

           दुष्काळामुळे पाणीटंचाईच्या तीव्र झळा सध्या करमाळा तालुक्याला जाणवू लागल्या असून या पाणी टंचाईच्या समस्येवरती मात करण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात मागणी केली आहे .सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,माझे करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे .या पाणीटंचाईच्या काळात गावोगावी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरला पाणी भरण्यासाठी पॉइंट दिलेले आहेत ,परंतु सध्या सर्वच जलस्त्रोत आटल्यामुळे सदर टँकर भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

       जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून 29 गावांसाठी पाणीपुरवठा करता येऊ शकतो, तसेच टँकरला फिडर पॉइंटही देता येऊ शकतो परंतु ही योजना नादुरुस्त असल्यामुळे लोकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांमध्ये नाराजी पसरली असून येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याची तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. तरी करमाळा मतदार संघातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जेऊर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्त होणे अपेक्षित आहे. सदर योजना सुरू करणे कामी संबंधितांना योग्य ते आदेश करणे संदर्भात सदर निवेदनात विनंती केलेली आहे.

         जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून१) जेऊर २) लव्हे ३) शेलगांव ४) वांगी नं.३५) भाळवणी ६) पांगरे ७) कविटगांव ८) बिटरगांव ९) झरे १०) कुंभेज ११) जेऊरवाडी १२) खडकेवाडी १३) पोफळज १४) कोंढेज १५) निंभोरे १६) वरकटणे १७) सरपडोह १८) गुळसडी १९) शेलगांव (क) २०) सौंदे २१) साडे २२) सालसे २३) घोटी २४) हिसरे २५) फिसरे २६) आळसुंदे २७) वरकुटे २८) नेरले २९) गौंडरे या गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो.

         उजनी धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे नियोजन करताना बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा 8 तासावरून 6 तास करण्याचे धोरण प्रशासनाने जाहीर केले असून त्यानुसार अंमलबजावणी केलेली आहे, परंतु उजनी धरणाच्या पाण्यावरती धरणग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची  मागणी ही आमदार शिंदे यांनी केली आहे.


टँकर साठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव तहसीलमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवावेत...

      एखाद्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणे या धोरणात सध्या बदल झाला असून दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव  तहसीलमार्फत प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा.तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.