जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाची 100 दिवसांत 7 वी आवृत्ती. युवा तरुणाईने दिली पसंती. पुस्तक ठरले बेस्ट सेलर! जगदीश ओहोळ.

By : Polticalface Team ,01-04-2024

जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाची 100 दिवसांत 7 वी आवृत्ती. युवा तरुणाईने दिली पसंती. पुस्तक ठरले बेस्ट सेलर!  जगदीश ओहोळ.

पुणे दौंड (प्रतिनिधी) अनिल गायकवाड. नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु जग बदलणारा बाप माणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे.  


आजच्या युवा तरुणाईला त्यांच्या भाषेत समजेल उमजेल अशा भाषेत लिहिलेले पुस्तक दिले.तर ते आवर्जून खरेदी करून का ? वाचणार नाहीत. या पुस्तकाच्या विक्री झालेल्या विक्रमातून दिसून येत आहे. 


व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा युवा तरुणांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वासार्थ लिहिलेले पुस्तक.(जग बदलणारा बाप माणूस) हे पुस्तक 3 डिसेंबर 2023 रोजी पुणे येथील फुलेवाडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रकाशित करण्यात आले. 


अवघ्या शंभर दिवसात म्हणजे 13 मार्च 2024 पर्यंत या पुस्तकाच्या सात आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, असे प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमातून बोलताना सांगितले. या पुस्तकाला तरुणाईकडून विशेष मागणी होत आहे. तसेच राज्यासह महाराष्ट्राच्या बाहेर व परदेशात अगदी दुबई, अमेरिका, युरोप या देशात ही मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पुस्तका बद्दल अनेक दिग्गज विचारवंत लेखक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेले आहेत.


जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकास ज्येष्ठ विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी प्रस्तावना लिहिली असून लेखकाचे पाठराखण पर शब्द प्राच्यविद्यापंडित डॉ.आ ह साळुंखे यांनी लिहिले आहे. तसेच या पुस्तका बद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, बीबीसीचे संपादक अभिजीत कांबळे. यांच्यासह अनेक दिग्गज अभ्यासक विचारवंतांनी व पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या असल्याचे बोलताना म्हणाले हे 

पुस्तक प्रकाशित होताच आठ दिवसातच प्रथमावृत्ती संपली असल्याने. वाचकांची अधिक मागणी वाढु लागली असल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. नव्या पिढीला समजेल अशा प्रेरणादायी शब्दात हे पुस्तक लिहिल्याने तरुणाईने या पुस्तकाला विशेष पसंती दिली आहे.

 तसेच अशा प्रकारे मोटिव्हेशनल पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करुन स्वाभिमानी लढा जीवन जगण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांचा   विषमतेच्या संघर्षा पलीकडे जाऊन. प्रत्येकासाठी कसे प्रेरणादायी आहेत? ते अजून आमच्या वाचनात आले नव्हते. अशा प्रतिक्रिया वाचक देत आहेत.


अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात, किंवा वाढदिवसाला, सत्कारासाठी हे पुस्तक लोक एकमेकांना भेट म्हणून देत आहेत, तसेच भीमजयंती निमित्त वितरणासाठी या पुस्तकाची मोठी मागणी होऊ लागली आहे. 


जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाला मिळत असणारा प्रतिसाद पाहता हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे, व संघर्षाचे यश आहे. नव्या  पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पचतील, पटतील व रूचतील अशा भाषेत बाबासाहेब सांगणे हे माझे कर्तव्य होते‌. ते मी केले आहे. सर्व समावेशक पध्दतीने सर्वांना आवडले आहे. हे मला जास्त महत्वाचे वाटते. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही चौकटीत बांधावे असे व्यक्तिमत्व नाही. त्यांचं कार्य हे जागतिक स्तरावरील असून. जगाला प्रेरणा देणारे आहे, असं आपण म्हणत असतो. पण ते या पुस्तकाच्या माध्यमातून सप्रमाण वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. हे पुस्तक जात, धर्म, प्रदेश सीमा ओलांडून सर्वव्यापी झाले. तशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याचा मनस्वी आनंद वाटतो. वाचकांच्या मागणीनुसार लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेत रुपांतर करुन आवृत्ती प्रकाशित करू. अशी प्रतिक्रिया लेखक जगदीश ओहोळ यांनी व्यक्त केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.