By : Polticalface Team ,06-04-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड बरोबरच कुकडीचे ही आवर्तन पुन्हा पूर्वत करा अशी मागणी घोड व कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत वेग धरू लागले आहे. सूर्य आता मोठ्या प्रमाणावर आगवताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आहे; त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होताना दिसतो प्रसंग अवधान राखून जलसंपदा विभागाने तातडीने उन्हाळी हंगामाचे हे आवर्तन पुन्हा पूर्ववत करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागले आहे. मागील एक मार्च रोजी वेळेत आवर्तन सोडल्याने घोडच्या आवर्तनातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे उभी पिके; फळबागा ऊस शेती व जनावरांचा पाणी प्रश्न काही अंशी शितिल झाला. व काही अंशी त्याला ओलावा निर्माण झाला असल्याचे शेतकरी सांगतात. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व मागील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता आहे; त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन जमिनीची भूक उन्हाच्या तीव्रतेमुळे मात्र तितकीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे घोड बरोबरच कुकडीचेही आवर्तन साधारणतः 15 ते 20 तारखेपर्यंत पुन्हा पूर्ववत करावेत; अन्यथा शेती पिकाची व पिण्याच्या पाण्याची मोठी दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. तत्पूर्वी जलसंपदा विभागाने शेती व शेतकरी वाचण्यासाठी उन्हाळी आवर्तन पुन्हा पूर्व करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दरम्यान शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार मागील उन्हाळी घोड व कुकडीचे आवर्तन साधारणता एक मार्च रोजी सोडण्यात आले. त्यामध्ये घोडचे जवळपास 29 दिवस आवर्तन चालले. सदर घोडचे आवर्तन बंद झाले त्यापूर्वी साधारणतः 25 ते 26 टक्के धरणात पाणीसाठा होता. साधारणता आवर्तनासाठी दीड टीएमसी पाण्यातून एक आवर्तन पूर्ण होत असते अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामध्ये मृतपाणी साठापेक्षा अधिक पाणीसाठा घोड धरणात असल्याने दुसरेही आवर्तन तातडीने सोडण्यास अडचण नसावी असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दुसरी आवर्तन तातडीने सोडल्यास उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळेल आणि उन्हाळी हंगामात पाऊस पडेपर्यंत जमिनीतील पाणी तक धरेल व पिण्याच्या पाणीसाठ्यातही वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्हीही धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी; सर्वपक्षीय नेते मंडळींनी शेती व शेतकरी वाचवण्यासाठी पक्ष विरहित एकत्रित निर्णय घेऊन संबंधित जलसंपदा विभाग व कालवा सल्लागार समिती बरोबर बैठक घेऊन उन्हाळी हंगाम अत्यंत कठीण असल्याने या पाणी प्रश्नासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. कारण उन्हाची तीव्रता अत्यंत भयानक असल्याचे शेतकरी सांगतात यासाठी उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन तातडीने सोडणे तितकेच गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
या आवर्तनाबरोबरच शेतकऱ्यांना आवर्तन कालावधीमध्ये शेतीपंपाची विज खंडित न करता 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवावी कारण सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत मोठ्या प्रमाणात जाणवत असून टेंपरेचर जवळपास 40 ते 42 टक्के पर्यंत जाऊन पोहोचल्याचे सर्वांना जाणवते अशा परिस्थितीत पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे मागील आवर्तन कालावधीतील जमिनीतील ओल देखील संपुष्टात आल्याचे शेतकरी सांगतात त्यामुळे आवर्तन कालावधीत अनेक उचल पाणी धारक असल्याने या कालावधीमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता व उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही करणारा हा उन्हाळी हंगाम शारीरिकदृष्ट्या धोक्याची घंटा सांगून जात आहे त्यामुळे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सह सर्वपक्षीय नेत्यांनी देखील महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून उन्हाळी हंगामात वीजपुरवठा पूर्ववत ठेवावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष