तालुक्यातील 20 इच्छुक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदी करून देणार - राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,08-04-2024

तालुक्यातील 20 इच्छुक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदी करून देणार - राजेंद्र दादा नागवडे

श्रीगोंदा : 

            सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्या मार्फत कारखान्याच्या हमीवर येत्या गळीत हंगामामध्ये तालुक्यातील 20 इच्छुक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदी करून देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली. 

             प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र दादा नागवडे यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासणार असून कारखान्यास दैनंदिन गाळप क्षमते इतका ऊस पुरवठा होत नाही. त्यामुळे ऊस तोडी करिता हार्वेस्टर मशीन खरेदी करणे अनिवार्य झाले आहे. नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील व तालुक्यातील हार्वेस्टर मशीन खरेदी करू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांना हमीपत्र देऊन बँकेकडून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून देणे करिता कारखान्यामार्फत सर्व मदत केली जाईल. हार्वेस्टर खरेदीदार इच्छुकांची संख्या वाढल्यास त्यांनाही कारखाना हमी देऊन कर्ज प्रकरण मंजुरीसाठी सर्व सहकार्य करणार आहे. तसेच आपल्या भागामध्ये हार्वेस्टर मशीन ऑपरेटरची सुद्धा कमतरता भासते. त्याकरिता कारखान्यामार्फत इच्छुक ऑपरेटरला मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

          तरी येत्या पंधरा दिवसांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील व तालुक्यातील हार्वेस्टर मशीन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क करून आपले नाव नोंदणी करावी. तदनंतर सर्व इच्छुक शेतकऱ्यांची एकत्रित सहविचार सभा घेऊन त्याबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल व हार्वेस्टर मशीन खरेदी बाबतची पुढील कार्यवाही टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी नागवडे कारखान्याच्या शेतकी विभाग कडे करावी. असे आवाहन चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.  यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य, प्रभारी कार्यकारी संचालक सतीश जांभळे,  शेतकी अधिकारी सचिन बागल, प्रसाद भोसले आदी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.