श्रीगोंदा तालुक्यात गुढीपाडवा सण उत्साही वातावरणात साजरा

By : Polticalface Team ,09-04-2024

श्रीगोंदा तालुक्यात गुढीपाडवा सण उत्साही वातावरणात साजरा

   नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात हिंदू धर्म प्रथेप्रमाणे गुढीपाडवा सण सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा सण संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक जण आपले स्वप्न साकार होण्यासाठी या सणाचे अवचित्य साधतात. या दिवशी घर; गाडी बंगला; सोने-चांदी; शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर इत्यादींची खरेदी व व्यवहार करतात. या दिवशी सर्वच व्यवहार हे फलदायी ठरतात असे ज्येष्ठविधी तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. निश्चितच गुढीपाडवा हा सण भारतीय परंपरेनुसार अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी मागील वर्षांमध्ये नफा- तोटा जीवनातील सुख-दुःखाच्या घडामोडी घडल्या; व्यवहार झाले हे आता मागील वर्षात ताळेबंद झाले. याची जाणीव ठेवत आता नवीन वर्ष या गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून सुरू होत आहे. निश्चितच मागील वर्षे हे काही सुखाचे व दुःखाचे क्षण देऊन देखील गेल्याचे ग्रामीण भागातून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी वर्ग सांगतात. तर त्याच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता मात्र कोरोना सारखा भयानक संसर्गजन्य रोग हा अत्यंत अंगावर शहारे देऊन गेला या दूरधर कोरोना कालावधीतअनेक कुटुंबातील तसेच तालुक्यातील काही राजकीय नेते; कुटुंबातील कर्ते पुरुष; व महिला यांचा देखील या बळी मध्ये समावेश दिसून आला. निश्चितच ते वर्ष सर्वांच्या दृष्टीने दुःखदायक ठरले गेले. त्याच बरोबर अनेक सर्वसामान्य कुटुंबातील चालते बोलते राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना देखील या कोरोना कालावधीत जावे लागले. त्या क्षणात सर्वांनाच मनाला तीव्र वेदना झाल्या.  त्यामुळे मागील दोन वर्षाच्या दुःखद घटनेला आपण सर्वांनीच आता पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. परंतु निश्चितच मन रहावत नाही. ज्या व्यक्तींशी़ सर्व क्षेत्रात संपर्क आला; त्यांची क्षणोक्षणी आठवण होणे प्रत्येकाला साहजिकच आहे. तसेच सरत्या वर्षात जे आप्तेष्ट नातेवाईक सर्वसामान्य व्यक्ती मृत्युमुखी पावलेल्यांना आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया.


       असो आता गुढीपाडवा च्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे आपण सर्वांनी स्वागत केले आहे या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा गुढीपाडवा सण भारतीय परंपरेनुसार तितकाच स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापसातील वैरपण भांडण तंटे; बांधावरची बांधणे या प्रकरणाला मूठमाती देऊन सर्वजण या नवीन वर्षात नवीन संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या भारतीय घटनेने दिलेले संविधानाची काटेकोरपणेअंमलबजावणी करून योग्य पद्धतीने हाताळूया. देश; राज्य; जिल्हा; तालुका व आपल्या मायभूमीचे रक्षण करण्यासाठी सर्वजण विकासाची मुहूर्त या सणाच्या पार्श्वभूमीवर पुढे नेऊया. अन्न; वस्त्र; निवारा या जीवनातील राष्ट्रीय संपत्तीचे आपण सर्वजण जतन करूया. भुकेलेल्या; तहानलेल्यांना; वृद्धांना तसेच निराधार व्यक्तींना आधार देऊया. हीच खरी आपणा सर्वांची या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सत्वपरीक्षा ठरणार आहे.


        भारतीय परंपरेनुसार या दिवशी सर्वच ग्रामीण व शहरी भागांमध्ये प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढी उभारून गुढीचे स्वागत केलेले आहे. या दिवशी कुटुंबासमवेत गुढीचे पूजन करून नवीन वर्षात कुटुंबाची भरभराट; सुख; शांती; समृद्धी प्राप्तीसाठी गुढीला प्रार्थना केल्याचे अनेक दांपत्यांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर ग्रामीण भागातील भावीक- भक्तांनी देखील आपापल्या ग्रामदेवता पुढे नतमस्तक होत नवीन वर्ष आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना यश मिळो अशा प्रार्थना व्यक्त करत आपल्या मनोकामना या शुभमुहूर्तावर प्रकट केल्याचे दिसून आले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष