एक लाख एकर क्षेत्र बागायत - एक लाख मते पाटील गटाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन संकल्प

By : Polticalface Team ,10-04-2024

एक लाख एकर क्षेत्र बागायत - एक लाख मते  पाटील गटाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन संकल्प करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील एक लाख एकर जिरायती शेती बागायत करुन दाखविण्याची धमक केवळ माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यामध्ये असुन बळीराजाने मतांची ताकद दिल्यास सन २०२९ पर्यंत करमाळा तालुक्यातील एक लाख क्षेत्र कायमस्वरूपी ओलीताखाली येईल असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला. पाटील गटाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख एकर क्षेत्र बागायत - एक लाख मते या नवीन संकल्पाची घोषणा तळेकर यांनी केली. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१४ ते २०१९ दरम्यान करमाळा तालुक्यातील जिरायती क्षेत्र बागायत करण्याचे धोरण अवलंबिले होते. यातुनच एकोणीस वर्षे रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे, सीना-कोळगाव उपसा सिंचन योजनेची चाचणी यशस्वी करुन दाखविणे, जलयुक्त शिवार योजनेतुन बंधारे, ओढा खोलीकरण, तलावांतील गाळ काढुन तलाव पुनर्बाधणी करणे, कुकडीची पाच वर्षात सतरा आवर्तने मिळवून देणे आदि सिंचनासाठी पुरक असलेली कामे करुन दाखविली. आता सन २०२४ ते २०२९ पर्यंत खास करुन बळीराजाने मनावर घेऊन नारायण (आबा) पाटील यांना परत एक संधी दिली तर करमाळा तालुक्यातील एक लाख एकर क्षेत्र कायमस्वरूपी ओलीताखाली आणण्याचे काम नारायण आबा पाटील करुन दाखवतील. यात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम पुर्ण करुन एकुण २५ हजार क्षेत्र ओलिताखाली आणणे, कुकडीच्या लाभ क्षेत्रातील ६५ हजार क्षेत्राचे उद्दीष्ट पुर्ण होऊ शकत नाही. यामुळे नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन या ६५ हजार एकर जिरायती भागास कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळवून देणे, वडशिवणे तलावात उजनीचे पाणी कायमस्वरूपी आणुन पाच हजार एकर क्षेत्र बागायत करुन दाखविणे, बोरगाव सह सात गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देणे, कृष्णा-मराठवाडा बोगद्यामधून करमाळा तालुक्याच्या हद्दीतील योजनेच्या नजीक असलेल्या गावांना शेतीसाठी उचलपाण्याचे कायमस्वरूपी परवाने मिळवून देणे, दहिगाव उपसा सिंचन योजनेत झरे, पोफळज, देवळातील उर्वरित भाग, सालसे, कोंढेज, मलवडी, निंभोरे, साडे, वरकुटे, नेरले, घोटी, आळसुंदे, पाथुर्डी आदि वंचित भागांतील जलसाठ्यांचा समावेश करुन शेतीसाठी पाणी मिळवून देणे यासह सिंचनवाढीसाठी आणखी बरेच उद्दीष्ट आणि उपाययोजना करण्याचा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा मानस असुन मतदारसंघातील शेतकऱ्यांनी एक लाख मतांचे पाठबळ दिल्यास हि सर्व कामे सन २०२४ ते २०२९ दरम्यान मार्गी लागतील. माजी आमदार नारायण आबा पाटील हे जलनायक आहेत आणि त्यांच्यामध्येच करमाळा तालुक्यातील जिरायती भागास बागायती क्षेत्र करुन दाखविण्याची क्षमता आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पाटील गटाने जाहीर केलेल्या या संकल्पास बळीराजा नक्कीच पाठींबा देईल असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष