श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,14-04-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी )--श्रीगोंदा तालुक्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक बाळासाहेब जठार यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिक्षक आनंदा पुराणे; एकनाथ नेटवटे यांच्यासह शिक्षक; शिक्षकेतर कर्मचारी; विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मढेवडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थ व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेला श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप शिक्षण ग्रामीण विकास शिक्षण संस्था या संस्थांच्या सर्व विद्यालयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साही वातावरण साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्रीगोंदा येथील स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या विद्यालय व रयत शिक्षण संस्थांच्या विद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध संस्था ग्रामपंचायत शिक्षण संस्था विविध शासकीय कार्यालय मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करत अभिवादन करण्यात आले.
लिंपणगाव येथील बस स्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व धर्मीय ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती विशद करण्यात आली.
वाचक क्रमांक :