महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध, मागील १० वर्षात महिलांसाठी सर्वाधिक योजना : खा. डॉ. सुजय विखे पाटील

By : Polticalface Team ,18-04-2024

महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध, मागील १० वर्षात महिलांसाठी सर्वाधिक योजना : खा. डॉ. सुजय विखे पाटील



लिंपणगाव प्रतिनिधी 


पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. 


“मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले. 


मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोजगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला. 



 जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी