प्राचार्य सस्ते व लिपिक पोपट राऊत यांनी शिक्षण संस्थेत उत्तम प्रकारे सेवा बजावली -अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडेप्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य सस्ते व राऊत यांचा संस्था व विद्यालयाकडून सन्मान

By : Polticalface Team ,20-04-2024

प्राचार्य सस्ते व लिपिक पोपट राऊत यांनी शिक्षण संस्थेत उत्तम प्रकारे सेवा बजावली -अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडेप्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य सस्ते व राऊत यांचा संस्था व विद्यालयाकडून सन्मान

लिंपणगाव (प्रतिनिधी)- प्राचार्य दत्तात्रय सस्ते व लिपिक पोपटराव यांनी शिक्षण संस्थेत प्रामाणिक ज्ञानदानाचे काम करत संस्था व विद्यालयाचा नावलौकिक वाढवला असे गौरवोद्गार सहकार महर्षी नागवडे करण्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी व्यक्त केले.


     श्री व्यंकनाथ विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते व लिपिक पोपट राऊत हे संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त संस्था व विद्यालयाच्या वतीने जिजाई मंगल कार्यालय निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते.


     यावेळी मार्गदर्शनपर भाषणात श्री नागवडे पुढे म्हणाले की; सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये विशेषता ग्रामीण भागात मुला मुलींना गावातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाच्या गंगा सुरू केल्या. त्यातून गोरगरीब मुला मुलींचे जीवन शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कारित घडले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनात  सुख समृद्धीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. हा दूरदृष्टीकोन  बापूंचा होता. त्यासाठी संस्थेमध्ये ज्ञानदान करत असताना प्राचार्य सस्ते व लिपिक राऊत यांनी देखील या संस्थेत आपले भरीव योगदान देत प्रामाणिकपणे सेवा केली. प्राचार्य सस्ते यांनी ज्ञानदानाबरोबरच व्यसनमुक्ती संघटनेत देखील उत्तम प्रकारे काम करत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. या दोन्हीही सेवानिवृत्तांना पुढील आयुष्यात सुख समृद्धी व समाज सेवा करण्यासाठी परमेश्वराने उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य द्यावे असे सांगून श्री नागवडे यांनी श्री सस्ते व राऊत यांना सेवानिवृत्ती बद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

       

      याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अविनाश कांबळे; श्री आनंदा पुराणे; व उपशिक्षिका श्रीमती नौशाद शेख मॅडम यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

     * सत्काराला उत्तर देताना प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी म्हणाले की; शिक्षण संस्थेचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी प्रतिकूल परिस्थितीत नोकरीची संधी दिली. त्या संधीचे सोने करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले. ज्ञानदान करत असताना 58 वर्षे कसे गेले हे कळलेच नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की संपूर्ण सेवा कालावधीत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळाने मौलिक असे सहकार्य लाभले. या कामी लोणी व्यंकनाच्या ग्रामस्थ व स्कूल कमिटीने देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. म्हणूनच आपण व्यंकनाथ विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधताना यशस्वी ठरलो असे भावनिक विचार  यावेळी सस्ते यांनी व्यक्त केले.


      सेवानिवृत्त लिपिक पोपटराव राऊत ऋण व्यक्त करताना म्हणाले सहकार महर्षी बापूंच्या कृपाशीर्वादाने व राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत नोकरीची संधी मिळाली आपणही प्रामाणिकपणे सेवा बजावल्याचे सांगितले.


     अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की; सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी ग्रामीण भागात खेडोपाडी शिक्षणाची गंगा उभी केली; तेव्हापासूनच खऱ्या अर्थानेतालुक्याचा शैक्षणिक विकास झाल्याचे दिसून येते. अगदी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारसरणीनुसार बापूंनी शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात क्रांती घडवून आणली. त्यातून अनेकांना नोकरीची संधी देखील मिळाली उच्च पदस्थ विद्यार्थी बनले. या संस्थेत प्राचार्य श्री सस्ते व श्री राऊत यांनी देखील उत्तम प्रकारे सेवा बजावून संस्थेचा नावलौकिक वाढवला असे गौरवोद्गार श्री भोस यांनी व्यक्त केले.


       याप्रसंगी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांनी शिक्षण संस्थेचा लेखाजोखा मांडत असताना सहकार महर्षी बापूंनी  शिक्षण संस्था उभ्या केल्याने 600 ते 700 तरुणांना नोकरीची संधी मिळाली. राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे योगदान देत आहेत प्रसंगी शिक्षण संस्थेची उत्तम प्रकारे घौडधौड चालू असल्याचे सांगितले. 


     या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सुभाषराव शिंदे; डी आर काकडे; प्रा सुरेश रसाळ; भाऊसाहेब बरकडे; माजी सभापती सखाराम जगताप; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; बी के लगड; प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी; विलासराव काकडे; दिलीपराव काकडे; पुरुषोत्तम लगड; चेअरमन बाळासाहेब थोरात; तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव मगर; खंडेराव काकडे; अकबर भाई इनामदार; रामदास घोडके; जमदाडे सर; बोडखे सर; सरपंच मनीषाताई नहाटा; उपसरपंच हनुमंत मगर; रावसाहेब वाघमारे; ह भ प व्यसनमुक्ती संघटनेचे नारायण गवळी सर; गोविंद महाराज शिंदे; माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे; मधुकर पवार; माध्यमिक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे; शिक्षक नेते रमजान हवलदार; सौ निवेदिता दवणे; शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप; संदीप डांगे; नीता मोहोळ; आदींसह छत्रपती व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सर्व आजी-माजी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद विद्यार्थी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी; ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        प्रास्ताविक उपशिक्षक संजय दळवी यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक शिवाजीराव इथापे यांनी तर आभार संभाजी इथापे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष