By : Polticalface Team ,20-04-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी) मढेवडगाव गावातील काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी ग्रामदैवतांना देखील वेठीस धरण्याचे पाप केले आहे .
संबंधित समाजकंटक यांनी जेव्हा ग्रामपंचायतने भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 हा साजरा करत असताना ध्वजारोहणाचा सोहळा भारतीय सैन्यांमध्ये आपलं योगदान देणाऱ्या जवानांच्या हस्ते पार पडला असताना अशी गौरवशाली गोष्टीला कधीही प्रसिध्दी दिली नाही ;तसे केले असते तर गावचे नावलौकिक झाले असते
परंतु गावातील काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी गावामध्ये असलेली शांतता व एकोपा भंग करण्यासाठी रचलेला हा कुटील डाव आहे.
कोणतीही शहानिशा न करता तक्रार देणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी मढेवडगाव ग्रामस्थ व नाभिक समाजाकडून होत आहे.
श्री सक्रोबा महाराजांच्या ओट्याच्या कामासाठी लागणारी विट व रेती एक वर्षापूर्वी आम्ही सर्व नाभिक समाज एकत्रित येऊन लोकवर्गणी करून खरेदी केलेली होती .
दिनांक २ व ३ मे रोजी मढेवडगावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त देवाच्या गाड्या ओढण्याच्या रस्त्याच्या लगत असल्याने रस्ता साफसफाई करताना सदर विट व रेती रस्त्यामध्ये येत असल्याने आम्ही त्याचा सदुउपयोग करण्याच्या उद्देशाने श्री सक्रुबा महाराजांचे ओट्याचे काम सुरू केले आहे
(हनुमंत जाधव श्री सक्रूबा महाराजांचे मानकरी )