माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पूर्व तयारीची बैठक जेऊर येथे संपन्न राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश
By : Polticalface Team ,24-04-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पुर्व तयारी साठीची बैठक पार पडली असुन दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. याबाबत आज पाटील गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि विविध पदांवर कार्यरत असलेले आजी माजी पदाधिकारी यांची एक संयूक्त बैठक जेऊर ता. करमाळा येथे पार पडली. बैठकीस करमाळा तालुक्यातील तसेच माढा तालुक्यातील छत्तीस गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपीठावर माजी आमदार नारायण आबा पाटील, शिक्षण महर्षी प्राचार्य जयप्रकाश बिले सर, सुखलाल लुणावत वकील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे, बापुराव देशमुख, रविबुआ कोकरे, बाजार समिती माजी संचालक रणसिंग बापु, देवानंद बागल, सभापती अतुल पाटील, जि प सदस्य बिभीषण आवटे, अमरजितसिंह साळुंके, डाॅ अमोल घाडगे-पाटील, महेंद्र पाटील, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, बाजार समिती माजी संचालक पंडीत वळेकर, कंदर सरपंच मौलासाहेब मुलाणी, रोपळे माजी सरपंच तात्या गोडगे, उपळवाटेचे हर्षल वाघमारे, म्हैसगावचे दयावान अतुल पाटील, भास्कर कांडेकर, अनिलकुमार गादिया, उपसरपंच नागेश झांजुर्णे, धनंजय शिरस्कर, बबन घागडे, शेलगाव सरपंच अमर ठोंबरे, तसेच विविध पदांवर काम करणारी मान्यवर मंडळी उपस्थित होती. देवानंद बागल यांनी २६ तारखेच्या सभेबद्दल माहिती देताना सांगितले की माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा कृषीमंत्री शरद पवार साहेब हे स्वतः करमाळा येथे हजर राहणार आहेत. दि २६ रोजी सकाळी दहा वाजता या सभेचे नियोजन केले असून कार्यकर्त्यानी आज उद्या आपल्या गावात बैठक घेऊन या सभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदार हजर राहतील यासाठी नियोजन करण्याचे आवाहन देवानंद बागल यांनी केले. प्रास्ताविक प्रा अर्जुनराव सरक यांनी केले तर यावेळी पवार सर, सुखलाल लुणावत, देवानंद बागल, बिभीषण आवटे, राजाभाऊ कदम, डाॅ अमोल घाडगे, रविंद्र कोकरे, अतुल पाटील, आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वांगी सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन श्री रविराज देशमुख व व्हाईस चेअरमन सौ. साधना नागनाथ मंगवडे यांचा सन्मान मा. आ.नारायण आबा पाटील व उपस्थिताच्या शुभहस्ते करण्यात आला. सुत्रसंचलन माजी ग्रा प सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार ग्रा.प सदस्य उमेश कांडेकर यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.