By : Polticalface Team ,26-04-2024
श्रीगोंदा: महापुरुषांनी समाजाला जोडायचे काम केले आहे महापुरुषांची जयंती व रमजान ईद एकत्र येणे हा तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल यांचे जयंती उत्सव सण म्हणून साजरे करावेत तरच आपापसातील भाईचारा व स्नेह वृध्दींगत होईलअसे प्रतिपादन डॉक्टर रफिक सय्यद यांनी केले . सावित्री फातिमा विचार मंच - फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांचे वतीने श्रीगोंदा येथील सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या पटांगणात आयोजित पहिली शिवजयंती साजरी करणारे स्त्री - शुद्राचे कैवारी , क्रांतीसुर्य , सत्यशोधक , राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव , भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर गुरू - शिष्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ . सय्यद बोलत होते .
विधात्याने एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून जन्मास घातले आहे . आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत . बंधू आहोत . फुले पैगंबरांचे गुणगान करतात तर पैगंबरांचे चरित्र जाणणे हे तुमचे कर्तव्य आहे . महापुरुषांची जयंती व रमजान ईद हा दुग्धशर्करा योग आहे या निमित्ताने सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे जयंती उत्सव साजरे करावयास हवे .पारनेर येथे महापुरुषांची जयंती उत्सव व ईद मिलन कार्यक्रम एकत्रित संपन्न झाला त्याप्रमाणेच सर्वत्र साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली . कुठे आहेत त्या फातिमेच्या लेकी ? कुठे आहेत महंमद महाराज तुकोबा , अनगडशा यांचे अनुयायी ? शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली ज्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते त्यांचे बांधव कुठे आहेत . त्यांना इतिहास माहित नाही , वास्तव माहित नाही ते म्हणतात देशांमध्ये जातीवाद , द्वेष , घृणा वाढत चालली आहे .याला तुम्ही कारणीभूत आहात असे सांगत डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले फुलेंनी पैगंबरांवर जो पोवाडा लिहिला आहे तो तुम्ही समजावून सांगणे गरजेचे होते .
*कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास जात प्रमादास गोडी गोडी*
*गाढिला अधर्म सर्वात अभेद ठाम केला*
म्हणजेच पैगंबरांनी अभेद ठाम केला आणि तुम्ही येत नाही , भेद करता असे सांगत मुस्लिम समाजाच्या तरुणांनीही अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्याची व सत्य माहित करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले .
ते पुढे म्हणाले इस्लामची शिकवण ही नाही पैगंबर म्हणतात तो मुस्लिमच नाही जो पोट भरून खाईल मात्र त्याचा शेजारी उपाशी राहील . भले तो कोणीही असो .तुमच्या वागण्यात पैगंबर कोठे आहेत . सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी पैगंबर यांनी स्त्री उद्धारासाठी महान कार्य केले आहे .त्याकाळी मुलींना जिवंत जाळण्याची प्रथा होती ती बंद केली . लोकांना सत्य ते सांगितले . त्यानंतर मुलगी जन्माला आल्यावर माय-बाप दिवाळी साजरी करू लागले . ज्या प्रमाणे नमाज , रोजा सक्तीचे आहे त्याप्रमाणेच शिक्षण देखील सक्तीचे केले . त्याचे महत्त्व पटवून दिले . ज्यांनी आपल्या मुलींना शिकवले , वाढवले व योग्य वयात आल्यानंतर तिचे योग्य वराशी लग्न लावून दिले त्यांच्या स्वर्गाची मी हमी घेतो असा पैगंबरांनी वादा केला आहे . महिलांना संपत्तीत वारसा हक्क दिला , तिच्या संमतीशिवाय विवाह होणार नाही हा कायदा बनवला , तलाक चा अधिकार दिला . आईच्या पायाखाली स्वर्ग आहे हा सन्मान स्री ला दिला . ज्योतीरावांनी पैगंबरांवर उगाच नाही जहाँमर्द महंमद हा पोवाडा लिहिला . महापुरुषांनी जोडायचे काम केले आहे आता तरी एकत्र या . दिवसेंदिवस परिस्थितीत बदल होत आहे एकोप्याची गरज आहे . आदेशा अनुसार संघटना , एकोप्याशिवाय तुम्ही मुस्लिमच नाही अशी तंबी देण्यासही ते विसरले नाहीत . तर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व पाथरी येथील प्राध्यापक आर आर यादव यांनी संत कबीर , रविदास , नामदेव ,चोखा ,गोरा , सावता , सेना , नरहरी हे सर्व समतेला मानणारे संत असल्याचे सांगून ज्योती रावांनी शिवाजी महाराजांचा इतिहास शोधून लिहिला ज्योतिरावांनीशिवराय ही दिले . शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले .सबाजीराव गायकवाड यांनी मदत केली . यांचा काय संबंध होता ? शाहू राजांनी तर आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी जाताना आमच्या बहिणीला माहेरी पाठवा असे देखील सांगीतले याचा अर्थ काय ? तर या सर्वच महापुरुषांचे फार मोठे योगदान आहे , आपल्यावर मोठे उपकार आहेत
गाडगेबाबा यांच्याबाबत सांगताना ते म्हणाले आपल्या मुलाच्या निधनाने जेव्हढे खचले नाहीत तेव्हढे दुःख बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेंव्हा गाडगे बाबांना झाले . त्यानंतर अवघ्या 14 दिवसातच त्यांचेही आयुष्य संपले हा आपले पणाचा इतिहास आहे . त्याप्रमाणेच अण्णाभाऊ साठे रशियात जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा गातात त्यामुळेच म्हटले आहे ते नव्हते एका जातीचे मात्र होते एका मतीचे एका नितीचे भूमिपुत्र एका मातीचे . या महापुरुषांचा इतिहास आपण जपला पाहिजे समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि न्याय या चतु:सूत्री वर आधारित नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी शिकलेल्या लोकांनी पहेल केली पाहिजे , यासाठी काम केले पाहिजे तरच महापुरुषांची जयंती आपण साजरी केली असे म्हणता येईल . असा उपदेश यादव सरांनी उपस्थितांना केला . महामानवांच्या जयंती साठी सातत्याने पुढाकार घेणारे ऍड . संभाजी बोरुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्योतिराव फुले , अण्णाभाऊ साठे , बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांवर प्रकाशित पुस्तकांचे उपस्थितांना वितरण केले .कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.