घोलपनगर येथील बालसंस्कार मोफत वाचन केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,01-05-2024
करमाळा प्रतिनिधी
सध्याच्या युगात बाल वयामध्ये मुले मोबाईलच्या नादामध्ये वाचनाची गोडी नाहीशी झाल्याने आजची मुले कोणत्याही पद्धतीचे वाचन करीत नाही आजच्या लहान बालकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी करमाळा शहरातील घोलपनगर येथील मस्कर क्लासेसच्या संचालिका महानंदा मस्कर मॅडम व त्यांचे पती सिद्धेश्वर मस्कर या दोघा दांपत्याने बाल संस्कार मोफत वाचन केंद्र नुकतेच सुरू केले होते त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहमय वातावरणात पार पडले
सदर मोफत बालसंस्कार वाचन केंद्राचे उद्घाटन यश कल्याणी चे गणेश करे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य कापले सर, सुनंदा माने मॅडम, दत्तात्रेय भस्मे सर, आसाराम धोत्रे सर, कापले मॅडम तसेच घोलप मॅडम सौ निंबाळकर मॅडम आदि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
मस्कर क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार मोफत वाचन केंद्राचा करमाळा शहरातील सुमारे 300 वाचक वर्गाने मनमुरादपणे लाभ घेतला करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये प्रथमतः भरविण्यात आलेल्या या मोफत बालसंस्कार वाचन केंद्राचे तालुक्यामधून भरभरून कौतुक केले जात आहे
यावेळी सिद्धेश्वर मस्कर व त्यांच्या पत्नी मस्कर मॅडम यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले एकंदर पाहता मस्कर क्लासच्या वतीने प्रथमताच भरविवण्यात आलेल्या या बाल संस्कार मोफत वाचक केंद्रं करमाळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे
वाचक क्रमांक :